१ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नवे नियम लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. चला पाहूया कोणते बदल होणार आहेत.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये आधार लिंक असलेल्यांना प्राधान्य
IRCTC वर तिकीट बुक करताना एजंट व दलालांकडून पहिल्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणावर बुकिंग होत असे, त्यामुळे सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळत नव्हती.
१ ऑक्टोबरपासून मोठा बदल – तिकीट बुकिंगची पहिली १५ मिनिटे फक्त आधार-लिंक आणि पूर्णपणे सत्यापित खातेदारांसाठी राखीव असतील.
पेन्शनमध्ये नवा पर्याय – एक PAN, अनेक स्कीम्स
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू होणार आहे.
- बिगर सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट प्रोफेशनल्स आणि गिग वर्कर्स आता एकाच PAN नंबरवर अनेक NPS स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकतील.
- गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि रिस्क प्रोफाइलनुसार सर्वोत्तम योजना निवडण्याचा पर्याय मिळेल.
डिजिटल पेमेंट सुरक्षित – UPI "रिक्वेस्ट फॉर मनी" फीचर बंद
आज लाखो लोक Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अॅप्सद्वारे पेमेंट करतात.
NPCI ने निर्णय घेतला आहे की, १ ऑक्टोबरपासून UPI चे “Request for Money” फीचर बंद होईल.
- याचा वापर करून फसवणूक आणि फिशिंगच्या घटना वाढत होत्या.
- हे फीचर बंद झाल्यामुळे डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील.
- Google Pay, PhonePe वरून “पैसे मागण्याची” सुविधा आता उपलब्ध राहणार नाही.
- ऑनलाइन गेमिंगवर कडक नजर – पारदर्शक नियम लागू
ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत असलं तरी, त्यात फसवणूक आणि बनावट अॅप्सची समस्या वाढली होती.
सरकारने मंजूर केलेले नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील.
- गेमिंग कंपन्यांवर कडक नजर ठेवली जाईल.
- खेळाडूंना सुरक्षित व पारदर्शक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.
- फसवणूक करणारे अॅप्स व बनावट गेम्सवर बंदी घालण्यात येईल.