Amul MD RS Sodhi Resigns: रुपिंदरसिंग सोधी 40 वर्षांपूर्वी अमूलमध्ये सिनिअर सेल्स ऑफिसर म्हणून रुजू झालेले सोधी 2010 मध्ये अमूलचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director-MD) झाले. संचालकपदाच्या जबाबदारीतूनही सोधी नुकतेच बाहेर पडले. पण त्यांच्या या कारकीर्दीत सोधी यांनी अमूलला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांनी जेव्हा एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. तेव्हा कंपनीच्या विक्रीची उलाढाल 9,774 कोटी रुपये होती. ती 2021-22 मध्ये पाच पटींनी वाढून 46,481 कोटी रुपये झाली. चला तर जाणून घेऊया सोधी यांचा अमूलमधील पहिला पगार, श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन आणि कंपनीने मारलेली भरारी.
रुपिंदरसिंग सोधी यांनी 2010 मध्ये अमूलच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा कंपनीची विक्रीतून होणारी उलाढाल 9,774 कोटी रुपये होती. ती सोधी यांच्या कार्यकाळात म्हणजे 2021-22 पर्यंत 46,481 कोटी रुपयांवर पोहोचली. या कालावधीत अमूलच्या विक्रीमध्ये 5 पटींनी वाढ झाली.
Table of contents [Show]
अवघ्या 1450 रुपयांपासून कामास सुरूवात
रुपिंदरसिंग सोधी हे 1982 मध्ये अमूलमध्ये वरिष्ठ विक्री अधिकारी (Senior Sales Officer) म्हणून रूजू झाले होते. त्यावेळी सोधी यांचा पगार अवघा 1450 रुपये होता. तिथे त्यांनी सुमारे 18 वर्षे काम केले. त्यानंतर वर्ष 2000 मध्ये त्यांची जनरल मॅनेजर (मार्केटिंग) पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे डेअरी प्रोडक्ट्च्या मार्केटिंगची जबाबदारी होती. इथे त्यांनी चांगली कामगिरी दाखवल्यामुळे 2010 मध्ये त्यांची व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली.
रुपिंदरसिंग सोधी कोण आहेत?
रुपिंदरसिंग सोधी यांचा अमूलमधला प्रवास खूपच रोमांचक असा आहे. कारण सोधी यांनी अमूलमध्ये 1982 पासून कामास सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांना अवघा 1450 रुपये पगार होता. तिथे सातत्याने चांगली कामगिरी दाखवत जनरल मॅनेजर पदावर मजल मारली. या पदावर असताना अमूलच्या प्रोडक्ट्सना देशभर पोहोचवण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत त्यांनी अमूलच्या प्रोडक्ट्सची विक्रीमध्ये वाढ करून कंपनीला चांगला महसून मिळवून दिला. या कालावधीत त्यांना वर्गीस कुरिअन यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. कारण कुरियन यांनी सुरु केलेल्या या अमूलच्या प्रवासात सोधी यांना चांगले मार्गदर्शन लाभले.
अमूलची नवनवीन उत्पादने बाजारात आणली
सोधी यांनी आपल्या कार्यकाळात अमूलची 50 हून अधिक नवीन उत्पादने बाजारात आणली. दुधाचे वेगवेगळे प्रकार, फ्लेवर्ड दूध, दुधापासून बनवलेली बर्फी, काजूकतली असे अनेक पदार्थ त्यांनी बाजारात आणले आणि ते फक्त आणले नाही तर ते तितक्याच ताकदीने लोकांपर्यंत पोहोचवले.
रुपिंदरसिंग सोधी यांचे शिक्षण
सोधी यांनी शेती या विषयामध्ये उदयपूर येथून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. तसेच त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंद येथूनही शिक्षण घेतले आहे. सोधी हे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंटच्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आनंद कृषी विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवीही मिळवली आहे.