• 07 Dec, 2022 07:58

Nykaa Bonus Shares: नायकाची दिवाळी ऑफर; एका शेअर्सवर 5 शेअर्स बोनस!

Nykaa Bonus Share Offer

Image Source : www.nykaa.com

Nykaa Bonus Shares: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी नायकाने एक गुड न्यूज आणली आहे; Nykaa कंपनी एका शेअरवर गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स देणार आहे.

Nykaa Bonus Shares : ऑनलाईन सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्या नायका या नामांकित ब्रॅण्डने आपल्या गुंतवणूकदारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट जाहीर केली. कंपनीने नायकाचा 1 शेअर घेतला की त्यावर 5 शेअर्स बोनस म्हणून देणार असल्याची घोषणा केली. सोमवारी (दि. 3 ऑक्टोबर) नायकाच्या संचालक मंडळाची बैठक पार पाडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

नायकाने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 5:1 नुसार बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली. कंपनीने याच बैठकीत बोनस शेअर्स देण्याची तारीख सुद्धा निश्चित केली.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट

नायका कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 3 नोव्हेंबर 2022 पासून बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. हे बोनस शेअर्स 2 डिसेंबर किंवा त्यापूर्वी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहेत. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये काल चांगली तेजी दिसून आली. 

[media url="https://www.youtube.com/watch?v=Ghn-TIsMgYM"][/media]


कंपनी किती शेअर्स जारी करणार?

कंपनीकडून प्रति शेअर 1 रुपये मूल्याचे 2,37,27,61,850 इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. कंपनीचे शेअर्स गेल्यावर्षी 10 नोव्हेंबर 2021 रोजी लिस्टिंग झाले होते. कंपनीने 5,300 कोटी रुपयांच्या आयपीओद्वारे शेअर्स जारी केले होते.

Nykaa कंपनीचे नाव FSN E-Commerce Ventures Ltd 

नायका हा ब्रॅण्ड असून, ब्रॅण्डच्या मूळ कंपनीचे नाव FSN E-Commerce Ventures Ltd आहे. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवडयातील उच्चांक 2574 रुपये तर निचांक 1208.4 रुपये आहे. नायकाचे शेअर्स यावर्षी सुमारे 35 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या 4-5 दिवसात नायकाच्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येते.