Mahendra Singh Dhoni New Movie: एकीकडे निवृत्तीनंतर भारताचा अव्वल खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) शेती करत आहे, तर दुसरीकडे हरभजन सिंग (Harbhajan Singh), युवराज सिंग (Yuvraj Sing), विराट कोहली (Virat Kohli), झहीर खान (Zaheer Khan) यांसारख्या खेळाडूंनी हाॅटेल व्यवसायात उडी मारली आहे. मात्र भारताच्या कूल कॅप्टनने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ने आपली वेगळीच वाट निवडली आहे. तो कोणत्या क्षेत्रात एन्ट्री घेत आहे, याबाबत जाणून घेवुयात.
धोनी कोणत्या क्षेत्रात करणार एन्ट्री (In which field Dhoni will Enter)
भारताचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटनंतर ‘चित्रपट निर्मिती’ (Film production) क्षेत्रात उतरण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ (Dhoni Entertainment Private Limited) असे आहे. या प्रोडक्शनअंतर्गत नुकत्याच एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. धोनी प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाचे नाव ‘एलजीएम : लेट्स गेट मॅरिड’(Let’s Get Married)असे आहे. हा तमिळ भाषेत चित्रपट असून लवकरच चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. या प्रोडक्शन हाऊसची व्यवस्थापकीय संचालक महेद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशलमिडीयावर शेयर करण्यात आले आहे.
धोनी प्रोडक्शन हाऊसचा पहिल्या चित्रपटाची पोस्ट (First Movie of Dhoni Production House)
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची नवीन इनिंग सुरू झाली आहे. धोनी एंटरटेन्मेंट अंतर्गत पहिल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर अधिकृत ट्विटर हँडलवर रिलीज करण्यात आले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘आम्ही धोनी एंटरटेनमेंटचे पहिले प्रोडक्शन टायटल शेअर करताना खूप उत्साही आहोत. तसेच पोस्टच्या माध्यमातून चित्रपटाच्या नावाची घोषणा व कलाकारांच्या नावाचादेखील खुलासा करण्यात आला आहे.
धोनी प्रोडक्शन पहिल्या चित्रपटातील कलाकार(Dhoni Production Film Cast)
धोनी प्रोडक्शन अंतर्गत पहिल्या चित्रपटाचे नाव ‘एलजीएम : लेट्स गेट मॅरिड’ असे आहे. हा चित्रपट तामिळ भाषेत असणार आहे. या चित्रपटात हरीश कल्याण, इवाना, नादिया, योगी बाबूसारखे मुख्य कलाकार झळकणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमनी हे करणार आहेत. धोनीचा हा पहिलाच चित्रपट कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.