• 28 Nov, 2022 16:52

One Nation One Charger : आता भारतात 'वन चार्जर वन नेशन' , कंपन्यांनी दर्शवली सहमती

One Nation One Charger, C Type Charger

One Nation One Charger : वन नेशन वन चार्जरची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास देशात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. 'कॉमन चार्जर पॉलिसी' लागू झाल्यास स्मार्टफोन, टॅबलेट आणि अन्य वियरेबल्स सारखे आपल्या दैनंदिन लागणाऱ्या सर्व डिव्हाइसला एकच यूनिव्हर्स चार्जरने चार्ज करता येईल.

भारतातील स्मार्टफोन कंपन्या आणि औद्योगिक संस्थांनी इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी एकच चार्जर पद्धत लागू करण्याच्या धोरणावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भारतात 'वन नेशन वन चार्जर' ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सामायिक चार्जरमुळे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी स्वतंत्र चार्जर घेण्याची आवश्यकता नाही. एकाच प्रकारच्या कॉमन चार्जरने हे डिव्हाईस चार्ज करता येतील.

सर्व विअरेबल म्हणजेच स्मार्टवॉचसारख्या गोष्टींसाठी एकच चार्जिंग पोर्ट वापरता येईल का, हे आता पडताळून पाहिले जाणार आहे. यावर विचार विनिमय करण्यासाठी एका गटाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहक विषयक प्रकरणाचे सचिव रोहित कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बुधवारी पार पडली. 'कॉमन चार्जर पॉलिसी' लागू झाल्यास  स्मार्टफोन, टॅबलेट आणि अन्य वियरेबल्स सारखे आपल्या दैनंदिन लागणाऱ्या सर्व डिव्हाइसला एकच यूनिव्हर्स चार्जरने चार्ज करता येईल.      

या बैठकीत  MAIT, FICCI, CII, IIT कानपूर, IIT (BHU) सह अनेक शैक्षणिक संस्था सोबत पर्यावरण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयातील प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला होता. बैठकीनंतर सर्व प्रतिनिधींनी वन नेशन वन चार्जरवर सहमती दर्शवली. मोबाइल आणि इतर Gadget साठी कॉमन चार्जिंग पोर्ट जारी करायला हवेत असा ठराव एकमताने करण्यात आला.बैठकीत सहभागी झालेल्या अनेकांनी स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि अन्य काही गॅझेटसाठी USB Type-C वर सहमती दर्शवली आहे.फिचर फोनसाठी वेगळे चार्जर असायला हवे,असा सल्ला दिला आहे. वन नेशन वन चार्जरची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास देशात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे.