जवाहरलाल नेहरू मेमोरिअल, इंदिरा गांधी मेमोरियल, राजीव गांधी फाऊंडेशन यांना देणगी देऊन आयकरात सूट मिळवायची असेल, तर आता तसे होणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात (Union Budget 2023-24) या तीन फाउंडेशनला देणग्यांवरील कपातीचा लाभ घेण्याच्या कक्षेतून वगळले आहे. आता या फाउंडेशनला देणग्या दिल्यास कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.
डोनेशनवर लाभ मिळणार नाही
अर्थसंकल्पीय प्रस्तावानुसार, जवाहरलाल नेहरू मेमोरियल, इंदिरा गांधी मेमोरियल, राजीव गांधी फाऊंडेशनला देणग्यांवरील 80G आयकर सूट काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. इन्कम टॅक्स कायद्याच्या 80G अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने या संस्थांना देणगी दिली, तर करदाते या देणगीवरील कपातीचा फायदा घेऊन कर वाचवू शकतात.
काय बदल करण्यात आला?
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80G च्या उप-कलम (2) मध्ये यादी समाविष्ट केली आहे. ज्यामध्ये मागील वर्षी भरलेल्या कोणत्याही देणगीची रक्कम 50%/ 100% च्या मर्यादेपर्यंत वजावट म्हणून दिली जाईल. त्यात काही व्यक्तींच्या नावांसह फक्त या 3 संस्थांचा समावेश आहे. अशाप्रकरचे पैसे हटवण्यासाठी, कायद्याच्या कलम 80G च्या उप-कलम (2) मधील उप-कलम (ii), (iiic) आणि (iiid) खंड (A) मधील सूट वगळण्याचा प्रस्ताव आहे.
1 एप्रिल 2024 पासून लागू होणार
राजीव गांधी फाऊंडेशन, ज्याच्याशी संबंधित घोषणा पत्र हे 21 जून, 1991 रोजी नवी दिल्ली येथे नोंदणीकृत करण्यात आले. ही दुरुस्ती 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. ही सुधारणा 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षाच्या संबंधात लागू होईल. हे माहीत असावे की 17 ऑगस्ट 1964 रोजी राष्ट्रीय समितीने घेतलेल्या बैठकीत जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, ज्याच्याशी संबंधित घोषणा पत्र 21 फेब्रुवारी 1985 रोजी नवी दिल्ली येथे नोंदणी करण्यात आली होती.