रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या(Reliance Industries Ltd) संचालक मंडळावर उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या आकाश, ईशा आणि अंनत अंबानी या तिन्ही मुलांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर या तिघाही मुलांना कंपनीकडून पगार दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या तिघांना संचालक मंडळाच्या बैठीमध्ये उपस्थित राहण्याचे मानधन दिले जाणार आहे. या तिघांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्यासंदर्भात कंपनीच्या भागधारकांना पाठवण्यात आलेल्या मंजुरीच्या ठरावपत्रामध्ये याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे.
कंपनीच्या नफ्यातून मिळणार कमिशन
अंबानी यांच्या तिन्ही मुलांना कंपनीच्या वार्षिक संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर या तिघांना बैठकाच्या मानधना व्यतिरिक्त कंपनीला होणाऱ्या वार्षिक नफ्यातील कमिशन दिले जाणार असल्याचाही उल्लेख कंपनीच्या ठरावपत्रामध्ये कऱण्यात आला आहे. तसेच या तिघांच्या नियुक्ती ज्या प्रमाणे 2014 मध्ये निता अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच प्रमाणे केली जाणार आहे. निता अंबानी यांनी आता संचालक मंडळाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, संचालक मंडळाच्या बैठकासाठी त्या कायम निमंत्रित असणार आहेत.
तिघांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या-
अंबानी यांची ही तिन्ही मुले रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक कंपनीच्या विविध विभागांचे प्रमुख असणार आहेत. यामध्ये आकाश हे दूरसंचार कंपनीचा(Jio) कारभार पाहणार आहेत. तर ईशा अंबानी या रिलायन्सचा रिटेल स्टोअरचा व्यवसाय पाहणार आहेत. तसेच अनंत अंबानी रिलायन्सच्या नवीन उर्जा क्षेत्रामध्ये लक्ष घालणार आहेत. या तिघांनाही पगार दिला जाणार नसून कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे मानधन आणि नफ्यातून कमिशन दिले जाणार आहे. दर्म्यान रिलायन्स कंपनीने या तिघांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यासाठी भागधारकांकडून पोस्टल समंतीपत्र मागवले आहेत.
मुकेश अंबानीही घेत नाहीत पगार
दरम्यान मुकेश अंबानी हे देखील कंपनीचे सीईओ म्हणून पुढील पाच वर्षापर्यंत कार्यरत राहणार आहेत. तसेच अंबानी हे देखील 2020-21 या आर्थिक वर्षापासून कंपनीकडून शून्य पगार घेत आहेत. त्याच प्रमाणे आता त्यांची मुले ही कंपनीकडून पगार घेणार नाहीत. दरम्यान, त्यांचे चुलत भाऊ निखिल आणि हितल अंबानी यांच्यासह इतर कार्यकारी संचालकांना कंपनीकडून पगार भत्ते आणि कमिशन दिले जाते.