जगातील आघाडीची टेक कंपनी ऍपल भारतात सतत विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. यंदा कंपनीच्या विक्रीत दुहेरी अंकाने वाढ झाली आहे. हा आनंद व्यक्त करताना ऍपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) म्हणाले की, कंपनीच्या भारतीय बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नाने आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, आम्ही केलेल्या कामगिरीचा आम्हांला आनंद होत आहे. या कामगिरीमुळे आम्ही सगळे आणखी उत्साही आहोत, असेही कुक म्हणाले.
यासोबतच देशातील ऍपल स्टोअरची (Apple Store) वाट पाहणाऱ्या आयफोनप्रेमींना कुक यांनीआनंदाची बातमी दिली आहे. कंपनी भारतात आपले किरकोळ स्टोअर उघडण्याच्या योजनेवर काम करत असून लवकरच आमच्या ग्राहकांना भारतात Apple Store पहायला मिळेल, अशी गुड न्यूज देखील टीम कुक यांनी दिली आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा भारतात ऍपलच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे
ऍपल स्टोअर मुंबईत सुरू होणार!
कूक म्हणाले की, सध्या आम्ही आमचे लक्ष भारतीय बाजारपेठेवर केंद्रित केले आहे. 2020 मध्ये आम्ही तेथे ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. लवकरच रिटेल स्टोअर (iPhone Retail Store) सुरू करणार आहोत. Apple भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देशातील पहिले फिजिकल स्टोअर सुरू करण्यासाठी वेगाने काम करत आहे.
यासोबत ते म्हणाले की, आम्ही आमची उत्पादने ग्राहकांना परवडणारी असावीत या योजनेवर काम करत आहोत, जेणेकरून लोकांना अधिकाधिक पर्याय मिळतील.
The iPhone 14 Plus is not selling well, yet, Apple is reportedly still moving forward with plans to release an iPhone 15 Plus ?
— Apple Hub (@theapplehub) February 3, 2023
Should Apple cancel the Plus model? pic.twitter.com/GwXKyn1cOd
ऍपलच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढ
Apple चे CFO लुका मेस्त्री म्हणाले की व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, भारत, ब्राझील आणि मेक्सिको सारख्या विकसनशील बाजारपेठांमध्ये iPhone ची विक्री दुहेरी अंकांनी वाढत आहे.
भारतात 2 दशलक्ष आयफोन विकले गेले
CMR डेटानुसार, 2022 च्या चौथ्या तिमाहीत Apple च्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. कंपनीने या काळात सुमारे 2 दशलक्ष आयफोन विकले आहेत. 2022 मध्ये कंपनीचा बाजार हिस्सा 11 टक्क्यांनी वाढून 5.5 टक्के इतका झाला आहे.