Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai-Delhi Expressway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटरवरून शेअर केले मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो

Delhi Mumbai Expressway

Mumbai-Delhi Expressway: देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेसवेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी स्वतः जातीने करत आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो शेअर केले आहेत.

Mumbai-Delhi Expressway: मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग पुर्ण झाल्यावर मुंबई-दिल्ली प्रवास फक्त 12 तासात करणे शक्य होणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून हा महामार्ग जात आहे. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे(Green Expressway) 1380 किलोमीटरचा असणार आहे. सध्या या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नुकतेच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari)यांनी पहिल्यांदाच दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाचे फोटो ट्विटरवर शेयर केले आहेत. हे फोटो प्रथमदर्शी पाहता आपण परदेशात असल्याचाच भास अनेकांना होणार आहे. मात्र हे फोटो परदेशातील नसून दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावरील बडोदा ते विरार दरम्यानचे आहे.

ट्विटरवरून शेअर केले फोटो(Photos shared from Twitter)

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे(Mumbai-Delhi Expressway) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये बडोदा-अंकलेश्वर, दिल्ली-जयपूर, मध्य प्रदेशात पसरलेले अनेक विभाग समाविष्ट आहेत. नितीन गडकरी यांनी हे फोटो ट्विटद्वारे शेयर करून यांनी #PragatiKaHighway #GatiShakti हे हॅशटॅग वापरले आहे. त्यात देश प्रगतीने विकासाच्या महामार्गावर जात असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. गडकरींचे हे ट्विट हजारोवेळा रिट्विट करण्यात आले असून हजारो जणांनी लाईक केले आहे.

कसा आहे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग(Delhi-Mumbai Expressway)

देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेसवेच्या(Green Expressway) कामाची पाहणी नितीन गडकरी स्वतः जातीने करत आहेत. या महामार्गासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च येणार असून दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेसवे देशातील सर्वात लांबीचा महामार्ग बनणार आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरने कमी होणार आहे. तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जसे की,  दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर जोडले जाईल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एकूण 8 लेनचा रस्ता असणार आहे.