Budget 2023 Update : आज संपूर्ण देश ज्या गोष्टीकडे डोळे लावून बसले होते, अखेर तो अर्थसंकल्प 2023-24 संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासंबंधी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. तर देशातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी विषयी..(National Digital Library)
कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणांवर परिणाम झाल्याने, त्यांचा विकास व्हावा यादृष्टीने ‘राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी’ (National Digital Library) सारखा महत्वपूर्ण विचार सरकारकडून करण्यात आला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले. तसेच पुस्तके वाचनातून मुलांचा विकास व्हावा या दृष्ट्रीने देशातील लहान मुले व तरूणांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लायब्ररी पंचायत व आणि वॉर्ड स्तरापर्यंत ओपन करण्यात येणार आहे. या लायब्ररीमध्ये इंग्रजी सहित प्रादेशिक भाषेतील पुस्तकेदेखील उपलब्ध असणार आहे. तसेच प्रत्येकाच्या वयोमानानुसार या लायब्ररीत पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहे.राज्यात थेट लायब्ररी सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले.