अदानी स्टॉक क्रॅश प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य पुढे आले आहे. या प्रकरणामुळे देशाची स्थिती आणि प्रतिमेला कोणताही धक्का बसला नसल्याचे त्या म्हणाल्या. या मुद्द्यावर आरबीआयकडून आधीच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एजन्सी त्यांचे काम करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एफपीओ मागे घेण्यावर अर्थमंत्र्यांनी दिले उत्तर
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, आपल्या देशात पहिल्यांदाच एफपीओ मागे घेण्यात आलेला नाही. याआधीही अनेकवेळा एफपीओ काढून घेण्यात आले आहेत. तुम्ही मला सांगा की याने भारताची प्रतिमा किती वेळा डागाळली आहे आणि किती वेळा एफपीओ परत आले नाहीत? FPO हा येतच राहतो. याआधी रिझर्व्ह बँकेनेही शुक्रवारी प्रतिक्रिया दिली होती. मध्यवर्ती बँकेने म्हटले होते की, भारतीय बँकांच्या व्यावसायिक गटाला दिलेल्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त करणारे मीडिया रिपोर्ट्स आले आहेत. मात्र, RBI एक नियामक आणि पर्यवेक्षक म्हणून आर्थिक स्थिरता राखण्यासाठी बँकिंग क्षेत्र आणि वैयक्तिक बँकांवर सतत लक्ष ठेवत असते, असे सांगण्यात आले होते.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) च्या बोर्डाने 20,000 कोटींची पूर्ण सदस्यता घेतलेली फॉलो पब्लिक ऑफर (FPO) काढून घेतली होती. कंपनीने याबाबत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला होता. ज्यांनी आतापर्यंत FPO चे सदस्यत्व घेतले आहे, त्यांचे पैसे परत केले जातील. अभूतपूर्व परिस्थिती आणि सध्याची बाजारातील अस्थिरता लक्षात घेता FPO उत्पन्न परत करून आणि पूर्ण झालेले व्यवहार परत करून आपल्या गुंतवणूक समुदायाच्या हिताचे रक्षण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले होते की, आमच्या FPO ला तुमचा पाठिंबा आणि वचनबद्धतेबद्दल सर्व गुंतवणूकदारांचे आभार मानण्याची ही संधी बोर्ड घेत आहे. FPO साठी सबस्क्रिप्शन काल यशस्वीरित्या बंद झाले. गेल्या आठवड्यात स्टॉकमधील अस्थिरता असूनही कंपनी, तिचा व्यवसाय आणि व्यवस्थापनावरील तुमचा विश्वास अत्यंत आश्वासक असल्याचे देखील सांगण्यात आले होते.