New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीने 23 ऑगस्ट, 2022 रोजी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पीएसयू इक्विटी फंड (ICICI Prudential PSU Equity Fund) ही नवीन फंड ऑफर (एनएफओ) बाजारात आणली. ही फंड ऑफर गुंतवणूकदारांसाठी 06 सप्टेंबरपर्यंत ओपन असणार आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पीएसयू इक्विटी फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम (Open Ended Equity Scheme) आहे. या स्कीमद्वारे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या पीएसयू कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली नफा मिळवण्याच्या उद्देशाने आणण्यात आला आहे. या स्कीममधून जमा झालेला निधी हा एस अण्ड पी बीएसई पीएसयू निर्देशांक (S&P BSE PSU Index)चा भाग असलेल्या सेक्टरमध्ये/शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकते.
गेल्या 17 वर्षांत एस अण्ड पी बीएसई पीएसयू निर्देशांकाचे सरासरी लाभांश उत्पन्न 2.6 तर एस अण्ड पी बीएसई सेन्सेक्सचे सरासरी लाभांश उत्पन्न 1.3 टक्के राहिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या स्कीममधील गुंतवणूक लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये करणार आहे. कंपनी पीएसयू शेअर्समध्ये किमान 80 टक्क्यांची गुंतवणूक करण्यासोबतच इतर इक्विटीज आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये 20 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकते. मित्तुल कलावाडिया आणि आनंद शर्मा (Fund Manager Mittul Kalawadia and Anand Sharma) हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पीएसयू इक्विटी फंडाचे फंड व्यवस्थापक आहेत.
प्रामुख्याने वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून लाभांश आणि भांडवलावरील नफ्यातून चांगला परतावा मिळवणे, हा या फंडचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कंपनीने, या योजनेतून गुंतवणुकीचे उद्दीष्ट साध्य होईल याची खात्री किंवा हमी दिली नाही. पण गेल्या 3 वर्षात खाली दिलेल्या बँकिंग आणि पीएसयू फंडांनी चांगला परतावा दिल्याचे दिसून येते.
इतर कंपन्यांचे पीएसयू फंड | मागील 3 वर्षातील परतावा (%) |
यूटीआय बँकिंग अॅण्ड पीएसयू डेब्ट फंड-रेग्युलर (जी) | 7.12 |
एडलवाईस बँकिंग अॅण्ड पीएसयू डेब्ट फंड-रेग्युलर (जी) | 6.95 |
आयडीएफसी बँकिंग अॅण्ड पीएसयू डेब्ट फंड-रेग्युलर (जी) | 6.27 |
कोटक बँकिंग अॅण्ड पीएसयू डेब्ट फंड (जी) | 6.26 |
आदित्य बिर्ला एसएल बँकिंग अॅण्ड पीएसयू डेट (जी) | 6.25 |
एनएफओ म्हणजे काय?
एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीत विशिष्ट प्रकारची योजना अस्तित्वात नसेल तर ती एनएफओच्या(NFO) माध्यमातून नव्याने बाजारात आणली जाते. गुंतवणूकदारांना एनएफओ अंतर्गत या स्कीममध्ये गुंतवणूक करता येते.