Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एनएफओ म्हणजे काय ?

एनएफओ म्हणजे काय ?

जेव्हा म्युच्युअल फंड कंपन्या बाजारात पहिल्यांदा फंड ऑफर करतात त्याला न्यू फंड ऑफर (NFO) म्हणतात.

जेव्हा म्युच्युअल फंड कंपनी बाजारात पहिल्यांदा फंड ऑफर करतो तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर म्हणजेच एनएफओ (New Fund Offers-NFO) म्हणतात. म्युच्युअल फंड कंपन्या बाजारातून पैसे गोळा करण्याच्या हेतूने, नवीन फंडची ऑफर आणतात. या व्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना नवीन फंडामध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर देखील दिली जाते.

एनएफओ म्हणजे काय? | What is NFO?

बाजारात आपल्या कंपनीतर्फे गुंतवणुकदारांना सर्व प्रकारच्या योजना दिल्या जाव्यात यासाठी म्युच्युअल फंड कंपन्या बाजारात एनएफओ (NFO) दाखल करतात. म्हणजे, एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीत विशिष्ट प्रकारची योजना अस्तित्वात नसेल तर ती एनएफओच्या (NFO) माध्यमातून नव्याने बाजारात आणली जाते. उदाहरणार्थ एखाद्या असेट मॅनेजमेंट कंपनीकडे हायब्रिड फंड (Hybrid Fund) अथवा मल्टिकॅप फंड (Multicap Fund) नसेल तर या योजना नव्याने दाखल केल्या जातात व त्यासाठी एनएफओचा (NFO) वापर केला जातो. एनएफओ (NFO) या ओपन व क्लोज एण्ड अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. क्लोज एण्डच्या एनएफओमध्ये (NFO) गुंतवणूकदाराला ऑफर चालू असेपर्यंतच गुंतवणूक करता येते. तर, ओपन एण्ड फंडात गुंतवणूकदाराला त्या दिवसाच्या एनएव्हीनुसार (Net Asset Value NAV) पैसे गुंतवता येतात.


एनएफओमध्ये गुंतवणूक करावी का?

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये संबंधित एनएफओच्या (NFO) फंडाची गरज असेल तरच एनएफओमध्ये (NFO) पैसे गुंतवणे योग्य ठरते, असा सल्ला गुंतवणूकतज्ज्ञ देतात. याशिवाय, विशिष्ट एनएफओला (NFO) पर्याय नसेल तरच त्यात गुंतवणूक करावी, असेही सांगितले जाते. एनएफओचा (NFO) एनएव्ही (NAV)हा अन्य योजनांच्या एनएव्हीपेक्षा (NAV) कमी असल्याने अनेक गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवतात. मात्र हे चुकीचे आहे. फंडात गुंतवणूक करताना ओपन एण्डेड फंडातच गुंतवणूक करणे योग्य असते. ओपन एण्डेड फंडांचा पूर्वेतिहास तपासता येत असल्याने ते अधिक विश्वासार्ह ठरतात. मात्र एनएफओबाबत (NFO) असा अंदाज करता येत नाही. एनएफओमध्ये (NFO) किती पैसे गोळा होतील, त्याची कामगिरी कशी होईल हे कोणीही सांगू शकत नाही.

एकूणच एनएफओ (NFO)  मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे आहे. त्यामुळे अनिश्चिततेऐवजी, मजबूत ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक करा. जर एनएफओ (NFO) काही खास असेल आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बसत असेल तर विचार करून गुंतवणूक करावी.