भारतातील मोठ्या महानगरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपयांना विकलं जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर इतकी आहे.
या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले
जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे
लखनौमध्ये पेट्रोल 96.44 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लिटर आहे
गुरुग्राममध्ये पेट्रोल ९६.८९ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर आहे
नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे
पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे
कच्च्या तेलाच्या आजच्या किमती
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत चाललेल्या कच्च्या तेलाच्या किमतीला आता ब्रेक लागल्याचे दिसते आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूडची किंमत $0.81 किंवा 0.93 टक्क्यांनी घसरून $86.66 वर आली आहे. त्याच वेळी, WTI क्रूडची किंमत $ 1.33 किंवा 1.64 टक्क्यांनी घसरून $ 79.68 वर आली.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे तपासणार?
तुम्ही फक्त एका क्लिकवर तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील तपासू शकता. इंडियन ऑइलनुसार, यासाठी तुम्हाला RSP <space> डीलर कोड 92249 92249 वर एसएमएस करावा लागेल.