Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Locker Rules: नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ग्राहकांना नवीन लॉकर ॲग्रीमेंट करावे लागणार!

New Locker Rules

RBI New Locker Rules: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नवीन नोटिफिकेशननुसार, बॅंकांना 1 जानेवारी, 2023 पासून ग्राहकांना नवीन लॉकर ॲग्रीमेंट द्यावे लागणार आहे. याबाबत सुप्रिम कोर्टानेही निर्देश दिले होते.

बॅंकेत ज्यांचे लॉकर (Bank Locker) आहे; त्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांना बॅंकेकडून नवीन लॉकर ॲग्रीमेंट सही करण्यासाठी बोलावले जाणार आहे. हे ॲग्रीमेंट लगेच म्हणजे 1 जानेवारी, 2023 पासून लागू होणार आहे. पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank-PNB) याबाबात आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवण्यास सुरूवात केली.

पीएनबी बॅंकेच्या काही ग्राहकांना आलेल्या मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे की, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार, बॅंकेच्या ज्या ग्राहकांकडे बॅंक लॉकर आहे. त्या ग्राहकांनी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत नवीन लॉकर ॲग्रीमेंट (New Locker Agreement) सही करून बॅंकेला सबमिट करायचे आहे.

1 जानेवारी, 2023 पासून नवीन लॉकर ॲग्रीमेंट | New Locker Agreement)

तुम्ही जर नव्याने बॅंकेकडून लॉकरची सुविधा घेण्याचा विचार करत आहात. तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. कारण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने लॉकरच्या नियमांममध्ये बदल केले आहेत. आरबीआयने याबाबत नोटीफिकेशनसुद्धा प्रसिद्ध केले होते. त्यातील काही नियमांचे पालन 1 जानेवारी, 2022 पासून सुरूही झाले आहे. आता नवीन लॉकर ॲग्रीमेंट ग्राहकांना 31 डिसेंबर, 2022 पर्यंत अपडेट करून घ्यायचे आहे.

लॉकर अग्रीमेंट काय आहे? What Locker Agreement?

पंजाब नॅशनल बॅंकेच्या ॲग्रीमेंट पॉलिसीनुसार, बॅंक ज्या ग्राहकाला लॉकरचे वाटप करणार आहे; त्या ग्राहकासोबत करार करणार असून, या करारावर दोन्ही ग्राहक आणि बॅंकेच्या प्रतिनिधींनी सही केल्यावर ती माहितीसाठी ग्राहकाचे ज्या बॅंकेत लॉकर (Bank Locker) आहे तिथे ठेवली जाणार आहे. 

लॉकरची सुविधा देणाऱ्या बॅंकांनी 1 जानेवारी, 2022 पासून काही नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. जसे की, लॉकर ॲक्सेस आणि ऑपरेशनसाठी ग्राहकाला एसएमएस आणि ईमेल अलर्ट पाठवला जातो. काही बॅंकांनी लॉकरच्या शुल्कातही वाढ केली. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आयडीवर पाठवण्यात आलेल्या माहितीच्या आधारावरच ग्राहकांना बॅंक लॉकरचा ॲक्सेस दिला जात आहे.