Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कशी वापरावी बँक लॉकरची सुविधा?

कशी वापरावी बँक लॉकरची सुविधा?

लॉकरची चावी हरवली तर काय, डुब्लिकेट चावी बनवता येते का? लॉकरची सर्व्हिस बंद कशी करायची हे जाणून घ्या

बहुतेकदा आपण आपली महत्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान चीजवस्तू आपल्याबँक लॉकरमध्ये ठेवतो.बँकर्सच्या हातात आपली वस्तू सुरक्षित आहे याचा आपल्यापैकी अनेकांना विश्वास असतो.पण हे खरंच इतकं सोपं आणि सुरक्षित आहे का ? आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत. ज्यामुळे आपण आपला लॉकर अजून सुरक्षित करु शकतो.सोबतच बँक लाॅकरचा विमा देखील काढु शकतो .               

बॅंक लॉकरच्या चाव्या हरवल्या तर ?          

सामान्यतः प्रत्येक लॉकरच्या दोन चाव्या असतात.एक तुमच्याकडे ठेवली जाते आणि दुसरी बँकेकडे असते.शक्यतो कोणतीही डुप्लीकेट चावी नसते. दुर्दैवाने जर तुमची चावी हरवली तर ?        

क्रेडिट कार्डप्रमाणेचतुमच्या लॉकरचा कोणताही गैरवापर टाळण्यासाठी तुम्हाला बँकेला ताबडतोब लेखी कळवावे लागेल.त्यानंतर बँक लॉकरच्या चावीचा डुप्लिकेट सेट तयार करण्याचा निर्णय घेते किंवा बँक अधिकारी आणि ग्राहक यांच्या उपस्थितीत लॉकर फोडण्याचा प्रयत्न करते. जेणेकरुन वस्तू हरवल्याबद्दल कोणताही वाद होऊ नये.बँक लॉकरची सामग्री सीलबंद बॉक्समध्ये ठेवून ती ग्राहकाच्या हाती सुपूर्द करते. बँका , सामान्यतः अशा सेवा पुरवण्यासाठी काही विशिष्ट रक्कमआकारतात.हे शुल्क बँकेनुसार , लॉकर्सच्या आकारानुसार वेगवेगळे असू शकते.

लॉकरचा उपयोग न करणे  हे बहुतांश  लोकांकडून होते. आपल्यापैकी बरेच लोक लॉकर घेतात पण ते त्याचा नियमित वापर करत नाहीत. काहीवेळा ते लॉकर वर्षानुवर्षे कार्यरत नसते.आपल्यापैकी काही लोक लॉकरचे वार्षिक शुल्क सुद्धाभरत नाहीत. अर्थात आता ही समस्या कमी झाली आहे.कारण बॅंक आता खात्यातूनच त्याची फी कापून घेते.

बँकांना विशिष्ट परिस्थितीत लॉकर बंद करण्याचे अधिकार आहेत.केवायसी , म्हणजे ग्राहकांची बेसिक माहितीव्यवसायनातेसंबंध इत्यादी असंख्य घटकांवर अवलंबून बँका त्यांच्या ग्राहकांना उच्चमध्यम आणि कमी जोखीम म्हणून वर्गीकृत करत असतात.

उच्च दर्जाची जोखीम असलेल्या ग्राहकांचे लॉकर्स बंद करण्याचा आणि ते एका वर्षापेक्षा जास्त काळ चालू न राहिल्यास ते इतरांना पुन्हा वाटप करण्याचा बँकांना अधिकार आहे.मध्यम जोखमीच्या ग्राहकांसाठीहा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवला जातो.बॅंकांना सामान्यत:ग्राहकांना सूचित करावे लागते आणि लॉकर न चालवल्याबद्दल लेखी उत्तर मागवावे लागते. जसे की ग्राहक नोकरीसाठी शहराबाहेर असेल तर त्याला तसे कळवावे लागते. त्यानुसार बँका अशा ग्राहकांचे लॉकर्स चालू ठेवतात.

लॉकर बंद करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कोणताही संदेश मिळाला नाही तर काय होईल           

काहीवेळा असे होऊ शकते की तुम्हाला बँकेची पत्रंवेळेवर मिळत नाहीत.अशा परिस्थितीत , बँकांनी तुमचे लॉकर आधीच बंद केले असण्याची दाट शक्यता असते.असे करताना बँक तुमच्या मौल्यवान वस्तू सील करेल आणि त्या सुरक्षितपणे त्यांच्याकडे ठेवेल.

लॉकर बंद झाल्याचे समजल्यानंतरतुम्ही त्यावर पुन्हा दावा करण्यासाठी बँकेकडे जाऊ शकता.बँका प्रतिसाद देत नसल्यासतुम्ही प्रत्यक्ष जाउन तोंडीतक्रार करू शकता किंवा औपचारिक तक्रार करू शकता किंवा तपशील मिळविण्यासाठी बँकेकडेमाहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज दाखल करू शकता.

आता तुमच्या लक्षात आले असेल की बँकेला तुमचे लॉकर बंद करायचे असल्यास किती गोष्टी कराव्या लागतात. आणि यासाठी किती मेहनत घेतली जाते.भविष्यातील हा त्रास टाळण्यासाठी फक्तलॉकर न घेता तो अधूनमधून वापरत रहा.