वर्ष 2022 प्रमाणे वाहन उत्पादक कंपन्या 2023 साठी सज्ज झाल्या आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो कंपन्यांनी कंबर कसली आहे. मारुती, ह्युंदाई, टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांसह सर्वच ऑटो कंपन्या नवीन मॉडेल्स लॉंच करणार आहे. जानेवारी महिन्यात किमान 25 नवीन कार बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकी जानेवारी महिन्यात तीन नवीन कार बाजारात दाखल करणार आहे. मारुती बलेनो क्रॉस याच महिन्यात लॉंच होण्याची शक्यता आहे. याच महिन्यात ह्युंदाय क्रेटा, वर्ना आणि ग्रॅंड आय 10 निओज (Grand i10 Nios) या नवीन कार लॉंच करण्यात येणार आहेत. ह्यंदायकडून Ai3 ला बाजारात आणण्याची तयारी केली जात आहे.
टाटा मोटर्स हॅरियर (Harrier) आणि सफारीच्या नवीन मॉडेल्सची घोषणा करण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक व्हेईलक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. नवीन वर्षात अल्ट्रोझ ईव्ही आणि पंच ईव्ही लाँच करण्याची घोषणा कंपनीकडून केली जाऊ शकते. हॅरियरचे EV मॉडेल देखील कंपनी लॉंच करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाकडून जानेवारी महिन्यात पहिली XUV 400 या एसयूव्ही गाडीचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करणार आहे. महिंद्राकडून चालू वर्षात थार आणि बोलेरो निओ प्लस भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहे. किया मोटर्सची भारतीय कंपनी किया इंडियाकडून सेल्टोस आणि कार्निव्हलची नवीन मॉडेल्स लॉंच करणार आहे.
टोयोटा 2023 मध्ये भारतात इनोव्हा हायक्रॉस आणि नवीन कूप-शैलीची SUV लाँच करण्याची शक्यता आहे. होंडाकडून 2023 मध्ये नवीन कॉम्पॅक्ट SUV लाँच केली जाणार आहे. कंपनीची ही नवीन SUV मारुती सुझुकी ब्रेझाला टक्कर देईल.सिट्रोन इंडिया ही कंपनी नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक 'eC3' आणि नवीन C3- ही एसयूव्ही कार लाँच करणार आहे. निसानकडून एसयूव्ही श्रेणीतील ‘एक्स-ट्रेल’ (X-Trail) लाँच करणार आहे. या कारमध्ये 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 12-व्होल्ट माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीचा समावेश आहे.