Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मित्राच्या जीवावर Netflix वापरताय? 2023 मध्ये पैसे मोजायची तयारी ठेवा

Netflix

Netflix 2023 पासून एक महत्वाचा बदल करतेय. यामुळे कदाचित तुमच्या खिशावरचा भार वाढू शकेल. हा निर्णय नेमका काय आहे ते जाणून घ्या.

पासवर्ड शेअरिंग काढून टाकणे हे  ग्राहकांसाठी चांगले नाही.  पण यामुळे कंपनीचे बरेच नुकसान होत आहे, असे नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे.  

तुम्ही वेब सीरीज आणि चित्रपट पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्म Netflix वापरत असाल तर तुमच्यासाठी हे महत्वाचे आहे. तुम्ही आता एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर Netflix वर लॉग इन करू शकणार आहात. सद्यस्थितीत  भारतात नेटफ्लिक्स खात्यावर अनेक वापरकर्ते लॉग इन करतात.  यामुळे कंपनीचे नुकसान होते. यामुळे आता कंपनी लॉगिन पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करणार आहे.

वॉशिंग्टन जर्नलने याविषयीचा  रिपोर्ट दिला आहे. नेटफ्लिक्स पुढील वर्षापासून यूजर्सना पासवर्ड शेअर करण्याची असणारी परवानगी मागे घेणार आहे. अचानक लागू करण्याऐवजी कंपनी हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने नवीन नियम लागू करू शकते, असे सांगितले जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की,  पासवर्ड शेअरिंग काढून टाकणे ग्राहकांसाठी चांगले नसले तरी यामुळे कंपनीचे बरेच नुकसान होताना दिसत आहे.

2023 पासून Netflix वर हा नियम लागू होऊ शकतो

कंपनी पुढील वर्षापासून नवीन नियम लागू करायचा विचार करत आहे. म्हणजेच, आता यूजर्सना नेटफ्लिक्स वापरण्यासाठी पासवर्ड शेअरिंग इकोसिस्टममधून बाहेर पडावे लागणार आहे. यूजर्सकडे अजून सशुल्क सदस्यता बायपास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

भारतात नेटफ्लिक्सचे  मासिक प्लॅन उपलब्ध आहेत.  सर्वात स्वस्त मोबाइल प्लॅन येतो.  त्याची किंमत 149 रुपये प्रति महिना इतकी आहे. मूळ प्लॅनची किंमत प्रति महिना 199 रुपये आहे. Netflix च्या स्टँडर्ड प्लॅन सबस्क्रिप्शनची किंमत 499 रुपये इतकी आणि प्रीमियम प्लॅन सबस्क्रिप्शनची किंमत 649 रुपये प्रति महिना इतकी आहे. त्याच वेळी कंपनीने जागतिक स्तरावर एक देखील एक प्लॅन लॉन्च केला आहे.  जर हा प्लॅन भारतात लॉन्च केला गेला तर त्याची किंमत 99 रुपये असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.