• 09 Feb, 2023 08:29

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Netflix : नेटफ्लिक्सच्या को-फाउंडर रीड हेस्टिंग यांचा राजीनामा

Netflix

Image Source : www.beamstart.com

Netflix : नेटफ्लिक्सने गुरुवारी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सर्व रेकॉर्ड मोडत नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या 230 दशलक्षहून अधिक झाली आहे

Netflix: OTT प्लॅटफॉर्म Netflix Inc. चे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्स यांनी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या दोन प्रमुख सहकाऱ्यांवर  जवाबदारी सोपवली आहे. OTT प्लॅटफॉर्म Netflix Inc. चे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्स यांनी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले की, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांनी आता दीर्घकालीन भागीदार आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पीटर्स यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

टेड सरांडोस आणि ग्रेस पीटर्स हे सीईओ म्हणून काम पाहणार 

रीड हेस्टिंग्ज आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. टेड सरांडोस आणि ग्रेस पीटर्स हे सीईओ म्हणून काम पाहतील. Netflix मधील हे बदल लगेचच अमलात आणले जातील. पीटर्स आणि सॅरांडोस यांची प्रमोशन कोरोनाच्‍या सुरुवातीच्या कालावधीत (जुलै 2020) कंपनीसाठी आव्हानात्मक होती.

2022 च्या पहिल्या सहामाहीत नेटफ्लिक्सला मोठा धक्का बसला

नेटफ्लिक्सने 2022 च्या पहिल्या सहामाहीत सदस्य गमावले. पण दुसऱ्या हाफमध्ये वाढ दिसली पण वेग अजूनही संथ होता. त्यानंतर नेटफ्लिक्सने कंपनीच्या फायद्यासाठी आपले धोरण बदलले. गेल्या नोव्हेंबरमध्ये 12 देशांमध्ये स्वस्त, जाहिरात-सपोर्टेड ऑप्शन सादर केला. तसेच पासवर्ड शेअरिंगवर कडक कारवाई करण्याची योजना जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सने आपल्या भागधारकांना पत्र लिहून सांगितले की होते की, हे वर्ष कठीण जाणार आहे. आमचा विश्वास आहे की आमची कमाई वाढवण्यासाठी आमच्याकडे एक स्पष्ट मार्ग आहे. नेटफ्लिक्सने गुरुवारी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. दुसरीकडे, गुरुवारी (19 जानेवारी) सर्व रेकॉर्ड मोडत नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या 230 दशलक्षहून अधिक झाली आहे. दुसरीकडे नेटफ्लिक्सचे शेअर्स गेल्या वर्षी जवळपास 38 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, नंतर कंपनीचा व्यापार 6.1 टक्क्यांनी वाढून 335.05 डॉलर इतका झाला  होता.