Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scholarships: परदेशात शिकायचंय तर 'ही' आहे केंद्राची शिष्यवृत्ती योजना!

National Overseas Scholarship Scheme

Government Scholarships For Study Abroad: भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत आहे. मंत्रालयाकडून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात.

Government Scholarships For Study Abroad: प्रत्येकाला आपले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण परदेशात घेण्याची इच्छा असते. मात्र, परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यासाठी शैक्षणिक खर्च. असे अनेक विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत, पण परदेशात जाण्यासाठी येणारा खर्च त्यांना परवडत नसल्याने अनेकांचं हे स्वप्न अपूर्णच राहते. तुमचं हेच स्वप्न केंद्र सरकारच्या एका योजनेतून पूर्ण होणार आहे. चला तर या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत आहे. मंत्रालयाकडून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट www.education.gov.in  ला भेट द्यावी लागणार आहे

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना

  1. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडून नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना देण्यात येते 
  2. ही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, विलुप्त होणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती, भूमिहीन शेतमजूर, पारंपरिक कारागीर आणि पारंपरिक कारागीर श्रेणीतील लोकांना दिली जात आहे 
  3. परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते
  4. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थांना अधिकृत वेबसाईट www.nosmsje.gov.in  ला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये, वैयक्तिक
  5. तपशील, अभ्यासक्रमाचे नाव आणि परदेशी विद्यापीठाचे नाव भरावे लागणार आहे 
  6. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्रे सादर करावी लागणार असून या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांना किमान ६० टक्के अधिक गुण असणे आवश्यक आहे

आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत ST विद्यार्थ्यांसाठी सरकारी शिष्यवृत्ती

एखादा विद्यार्थी अनुसूचित जमातीमधून असेल तर त्याला परदेशात शिक्षण घेण्याचीही संधी आहे. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप योजना आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत चालवली जात असून यासाठी विद्यार्थ्यांना www.overseas.tribal.gov.in  या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.  दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पीएचडी आणि पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप प्रोग्राम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रदान करण्यात येते. परदेशी संस्थांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणे हा या फेलोशिपचा मुख्य उद्देश असतो. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जात असून ती मिळवण्यासाठी उमेदवार STEM विषयातील पूर्ण-वेळ पीएचडी पदवीशी संबंधित असणे गरजेचे आहे. शिष्यवृत्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थी www.serbonline.in  ला भेट देऊ शकतात.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी व्याज अनुदान योजना राबविली जाते. याअंतर्गत परदेशात शिक्षणासाठी घेतलेले कर्ज माफ करण्याची ही योजना आहे. या संदर्भात उमेदवारांना त्यांच्या बँकेचे तपशील देणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार www.minorityaffairs.gov.in  या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.