Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nashik Grapes Export: द्राक्ष निर्यातीत नाशिक ठरले अव्वल; शेकडो शेतकरी झाले कोट्याधीश

Nashik Grapes Export

Nashik Grapes Export: सह्याद्री फार्म ही द्राक्ष निर्यात करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षांपैकी 17% द्राक्षे या कंपनीची आहेत. कंपनीने 2022 मध्ये द्राक्ष निर्यात करून 800 कोटी रुपयांची कमाई केली.

सह्याद्री फार्म ही नाशिकमधील फळे आयात व निर्यात करणारी कंपनी आहे. जिल्ह्यातील शेतकरांच्या एका मोठ्या गटाकडून ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. 2022 साली या कंपनीने देशात द्राक्ष निर्यातीचा उच्चांक गाठला होता.  सह्याद्री फार्म ही कंपनी शेतकऱ्यांच्या गटाद्वारे किंवा शेतकरी उत्पादन कंपन्यांद्वारे (FPC) चालवली जाते. म्हणजेच, एकाच पिकाची लागवड करणारे 10 किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी स्वत:चे एफपीसी तयार करून उत्पादनाची विक्री करू शकतात. जसे की स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या समूहाकडून तयार झालेली 'प्रोसेसर' ही भारतातील सर्वात मोठी टोमॅटो उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मालकीच्या 'किसान टोमॅटो केचप'ला एकूण विक्रीपैकी 50% मालाचा पुरवठा करते. सह्याद्री फार्मचे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे.

नाशिकमधील कृषी क्षेत्रात निर्माण झालेली सर्वात मोठी समस्या म्हणजे 75% शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. कोणत्याही वर्षी पीक खूप चांगले असल्यास एकरी सुमारे 10,000 किलो द्राक्षे इतके पीक निघते. 1 टन द्राक्ष खरेदीसाठी मोठे व्यापारी पुढे सरसावत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अतिशय कमी किमतीत या द्राक्षांची निर्मिती करावी लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फारच किरकोळ फायदा मिळतो.

जगभरात द्राक्षांची निर्यात

देशात अनेक शेतकरी एकत्र येऊन पिकांची विक्री करतात. या अंतर्गत, जेव्हा ते 500 टन किंवा 1000 टन माल घेऊन शेतकरी बाजारात जातात. तेव्हा त्यावेळी ते वाटाघाटी करण्यासाठी सक्षम असतात. सह्याद्री फार्मा ही देशातील सर्वात मोठी एफपीसी म्हणूनही ओळखली जाते. दरवर्षी सुमारे 18,000 टन द्राक्षांची निर्यात होते. ही द्राक्षे प्रामुख्याने युरोप आणि मध्य-पूर्व देशांमध्ये पाठवली जातात, जिथे त्यांना चांगली मागणी आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आज 18,000 पेक्षा जास्त नोंदणीकृत शेतकरी आहेत. ज्यांची एकूण 30,000 एकर जमीन आहे. नाशिकपासून पुण्यापर्यंत सुमारे 252 गावांमध्ये कंपनीचे अस्तित्व आहे आणि त्याची उत्पादने जगातील 42 देशांमध्ये जातात.

800 शेतकऱ्यांचे पालटले नशीब

सुमारे 800 द्राक्ष उत्पादक शेतकरी एका दशकापूर्वी सह्याद्री फार्मशी जोडले गेले होते. या सर्वांची एक एकरपेक्षा जास्त जमीन आहे. शेतीतील यशामुळे हे सर्व शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या भक्कम आहेत. त्यांच्यापैकी अनेकांचे शेतीचे उत्पन्न आता 1 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे आणि जर आपण त्यांच्या कंपनीतील शेअर्सचे मूल्य जोडले तर त्यांची संपत्ती सुमारे 10 कोटी रुपयांपर्यंत झाली आहे.

Source: www.moneycontrol.com