Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Funds for women: फक्त 250 रुपयात SIP, गुंतवणूकदारांना कसा होईल याचा फायदा?

Mutual Fund

Image Source : https://www.freepik.com/

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विचार करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 250 रुपयांच्या एसआयपीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सेबी विचार करत आहे. सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या संख्या प्रचंड वाढली आहे. कमी उत्पन्न असणारी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा सहज म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकते. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दरमहिना/ तिमाही अथवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. अनेकजण एकरकमी गुंतवणुकीच्या तुलनेत दरमहिना एसआयपीच्या (Systematic Investment Plans) माध्यमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

एसआयपीमुळे अवघ्या 500 रुपयापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते. मात्र, आता सेबी दरमहिना फक्त 250 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतविण्याची योजना आणण्याच्या तयारीत आहे. ज्या महिलांकडे जास्त भांडवल किंवा गुंतवणुकीचे अनेक पर्याय नाहीत त्यांच्यासाठी हे खरोखर फायदेशीर ठरेल. 250 रुपयांच्या एसआयपीमुळे नक्की काय फायदा होऊ शकतो, हे समजून घेऊयात. 

दरमहिना गुंतवा फक्त 250 रुपये

एसआयपीच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीची शिस्त लागते. एसआयपीला तुम्ही एकप्रकारे आवर्त्ती ठेवी म्हणू शकता. तुम्ही दरमहिन्याला यात ठराविक रक्कम जमा करू शकता व यावर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने भरघोस परतावा मिळतो. त्यामुळे एसआयपीची रक्कम जेवढी कमी असेल, तेवढ्या अधिक गुंतवणुकीच्या संधी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतील.

सध्या, म्युच्युअल फंड्समध्ये अवघ्या 500 रुपये एसआयपीचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड्स हाउसेस व सर्वसामान्य गुंतवणूकदार दोन्हींच्या दृष्टीने विचार करून 250 रुपयात एसआयपी उपलब्ध करण्यावर विचार सुरू आहे.

‘आर्थिक समावेशन व बाजाराच्या बळकटीसाठी महत्त्वाचे’

'सेबी'च्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी कमी रक्कमेच्या एसआयपीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी म्युच्युअल फंड हाउसेससोबत मिळून काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महिलांचा आर्थिक समावेशकता निर्माण होईल व बाजाराला देखील बळकटी मिळेल, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, भारतीय म्युच्युअल फंड बाजारातील आर्थिक उलाढाल ही 50 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहचली आहे. भारतात सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जवळपास 4 कोटी आहे. या निर्णयामुळे भविष्यात हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो - कारण महिलांना आकर्षक गुंतवणूक पर्याय मिळतात जो तुलनेने कमी जोखीम आणि चांगला परतावा देतो.

250 रुपयांच्या एसआयपीचे फायदे 

आर्थिक समावेशनअनेकांना गुंतवणूक करणे हे केवळ श्रीमंतांचे काम आहे असे वाटते. परंतु, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही कमी कमी रक्कम गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. 250 रुपयात एसआयपीचा पर्याय उपलब्ध झाल्यास गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच, जे शेअर बाजार व म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे टाळतात त्यांच्या आर्थिक समावेशनासाठी देखील मदत होईल. 
बचतीचा मार्गएसआयपीमुळे दरमहिना बचत करण्याची सवय लागते. अनेकदा आपण दरमहिन्याला मिळणाऱ्या पगारातील सर्व रक्कम खर्च करतो. मात्र, एसआयपीमुळे दरमहिना ठराविक रक्कम बाजूला पडेल व भविष्यात याच पैशांचा फायदा होईल. 
गुंतवणुकीत विविधताएसआयपीच्या माध्यमातून 100 रुपयात गुंतवणूक सुरू करणे शक्य आहे. पण अशा म्युच्युअल फंड्सची संख्या मर्यादित आहे. मात्र, कमी गुंतवणुकीत सर्व म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे शक्य झाल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे कमी जोखीम स्विकारून भविष्यातील आर्थिक उद्देश पूर्ण करणे शक्य होईल. 
कमी जोखीम जास्त फायदानुकसान होईल या भितीने अनेकजण मोठी गुंतवणूक करणे टाळतात. मात्र, फक्त 250 रुपये दरमहिना गुंतवणूक करणे बहुतांशजणांना शक्य असते. त्यामुळे एकरकमी गुंतवणुकीच्या तुलनेत फक्त 250 रुपये दरमहिना जमा करणे कधीही चांगले. 250 रुपयांच्या एसआयपीमुळे कमी जोखीम स्विकारून जास्त परतावा घेण्याची संधी मिळेल.