Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. भांडवली बाजारात अल्प कालावधीत अनेक चढउतार होत असतात. मात्र, पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा विचार करता बाजार प्रगती करण्याची शक्यता जास्त असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या अनेक योजना बाजारात आहेत. इक्विटी, डेट, रोखे आणि मनी मार्केटसह इतरही पर्यायांत म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक केली जाते. जर तुम्हाला 30 लाख रुपये म्युच्युअल फंडातून मिळवायचे असतील तर किती पैसे दरमहा गुंतवावे लागतील, तसेच किती कालावधीसाठी ही गुंतवणूक करावी लागेल ते आपण या लेखात पाहू.
सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. एक निश्चित रक्कम तुम्ही दरमहा किंवा दोन, तीन, सहा महिने, वर्षातून एकदा या पद्धतीने गुंतवू शकता. न चुकता शिस्तीने गुंतवणूक केली तर दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
30 लाख रुपये मिळवण्यासाठी SIP मध्ये किती रुपये आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागू शकते, ते आपण या लेखात पाहू. 2023 वर्षात प्रकाशित झालेल्या ‘Wealth Conversations Report’ नुसार आपण वार्षिक परताव्याचा दर 12% गृहित धरू. मागील काही वर्षात अनेक म्युच्युअल फंडांनी 12% टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. मात्र, गुंतवणूक करताना कायम अधिकृत आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला हवी. कारण, प्रत्येकाचे आर्थिक ध्येय वेगवेगळे असू शकते. त्यामुळे तुमच्यासाठी कोणती योजना योग्य आहे हे आर्थिक सल्लागार चांगले सांगू शकेल.
गुंतवणुकीचे विविध पर्याय काय असू शकतात?
- दरमहा 10 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 12 टक्के (CAGR) व्याजदराने 11 वर्ष 7 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 20 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 12 टक्के व्याजदराने 7 वर्ष 8 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 25 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 12 टक्के व्याजदराने 6 वर्ष 7 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 30 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 12 टक्के व्याजदराने 5 वर्ष 10 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 40 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 12 टक्के व्याजदराने 4 वर्ष 8 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 50 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 12 टक्के व्याजदराने 3 वर्ष 11 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 75 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 12 टक्के व्याजदराने 2 वर्ष 10 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
- दरमहा 1 लाख रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 12 टक्के व्याजदराने 2 वर्ष 3 महिन्यात 30 लाख रुपयांची राशी जमा होऊ शकते.
डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)