Vasai Virar City Municipal Corporation: वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागामध्ये अजूनही अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती पाहायला मिळत आहेत. या इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणात शहरात 50 इमारती या अतिधोकादायक असल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
50 इमारती या अतिधोकादायक
वसई विरार(Vasai-Virar) शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या इमारती पाहायला मिळत आहे. या जुन्या इमारतीत अजूनही नागरिक राहत आहेत. परंतु जसजशी वर्षे उलटून जात आहेत त्यातील काही इमारती जीर्ण होत चालल्या आहे. ज्यामुळे त्या धोकादायक बनू लागल्या आहेत. काही वेळा अशा धोकादायक असलेल्या इमारती कोसळून दुर्घटना होतात. नुकतीच नालासोपारा पूर्वेच्या तुळींज(Tulij) परिसरातील साई निवास(Sai Niwas) या एकमजली चाळीचा भाग कोसळल्याची घटना घडल्याचे पाहायला मिळाले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिकेने(Vasai Virar City Municipal Corporation) शहरात प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरु करून धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.
या सर्वेक्षणात 50 इमारती या अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या अतिधोकादायक असलेल्या इमारतींना पालिकेकडून नोटिसा पाठविण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने त्यांना तोडण्याचे कामही पालिकेकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी अजूनही रहिवासी राहत आहेत. तर यातील जवळपास 22 प्रकरणे ही न्यायालयीन प्रक्रियेत चालू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
274 अतिधोकादायक इमारती पडल्या
वसई विरार शहरात अतिधोकादायक असलेल्या इमारती या सी 1 वर्गात येत आहेत. या इमारती तातडीने जमीनदोस्त करणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या खाली करून टप्प्याटप्प्याने पाडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 274 अतिधोकादायक इमारती तोडल्या असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.