महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) 2 नवीन मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. नव्या मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोची झलक बघूया.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde, CM Maharashtra) यांचे सरकार आल्यानंतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. आता वेळ आहे मुंबई मेट्रोच्या 2 नवीन लाईन्सच्या उद्घाटनाची. (Image Source - www.mid-day.com )
मुंबईतील मेट्रोच्या दोन नवीन मार्गिका 2A आणि 7 चे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा यापूर्वीच सुरू झाला. (Image Source - www.timesnownews.com )
लाइन-2A डीएन नगर अंधेरी ते दहिसरला जोडेल. तर लाईन-7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वेला जोडेल. (Image Source : www.mid-day.com )
दोन्ही मेट्रो मार्गांची एकूण लांबी 35 किमी आहे. तर एलिव्हेटेड स्थानकांची संख्या 30 आहे. या दोन्ही मार्गावरून दररोज सुमारे 25,000 लोक प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. या मार्गावरील सर्व मेट्रोचे डबे भारतात बनवले आहेत. या दोन्ही मार्गांचा प्रकल्प खर्च सुमारे 12,600 कोटी रुपये आहे. (Image Source : www.mid-day.com )