भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बाजी मारली. रविवारी 26 मार्च 2023 रोजी मुंबईत पार पडलेल्या फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला. महिलांच्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स पहिलीच टीम ठरली. मुंबई इंडियन्सला गोल्डन ट्रॉफी आणि 6 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात महिला आयपीएलची फायनल रंगली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी बाद 131 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने हे टार्गेट 19.3 ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुंबईकडून नॅट सिव्हर ब्रंट हिने नाबाद 60 धावांची खेळी केली. यात तिने 7 चौकार मारले. मुंबईची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने 39 चेंडूत 37 धावा केल्या.
हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. मुंबईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावांची गरज होती. षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुंबईच्या नॅट सिव्हर ब्रंटने चौकार लगावत मुंबईच्या विजयाववर शिक्कामोर्तब केले.अंतिम सामन्याची मानकरी म्हणून नॅट सिव्हर ब्रंट हिला गौरवण्यात आले. नॅट सिव्हर ब्रंट हिला 2.5 लाखांचे बक्षीस देण्यात आले. हॅले मॅथ्यूज हिला पर्पल कॅप आणि मेग लॅनिंग हिला ऑरेंज कॅपने गौरवण्यात आले.मुंबई इंडियन्स संघाला 6 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उपविजेते दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटींचे बक्षीस देण्यात आले. यावेळी बोलताना मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौर म्हणाली की या स्पर्धेसाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करत होतो. पहिला सीझन सर्वांसाठी आनंदाचा गेला. प्रत्येकीने या स्पर्धेत योगदान दिले. आम्ही विजयी होणार अशी खात्री होती असे कौर हिने सांगितले.
महिला आयपीएलच्या पहिल्या सीझनची गोल्डन ट्रॉफी मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने उचलली आणि संघातील इतर खेळाडूंनी जल्लोष केला. महिला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या मेग लॅगिंगने सर्वाधिक सर्वाधिक 345 धावा केल्या. हॅले मॅथ्यूजने सर्वाधिक 16 विकेट्स काढल्या. लॅगिंग आणि मॅथ्यूज यांना प्रत्येक 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. मुंबई इंडियन्समधील यास्तिका भाटिया ही उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. तीला 5 लाखांचे पारितोषिक देण्यात आले. दिल्लीच्या राधा यादव हिला पॉवर स्ट्रायकरचा पुरस्कार देण्यात आला. यादव हिला 1 लाखांचे पारितोषिक देण्यात आले.