Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Share : धागा व्यवसायात गुंतवणूक करून गुंतवणूकदार बनले करोडपती

Multibagger Share

Multibagger Stock : एकिकडे शेअर मार्केट मधील प्रचंड उतार चढावाचा सामना गुंतवणुकदार करीत आहेत. तर दुसरीकडे सिंथेटिक धागा तयार करणाऱ्या एका कंपनीचे शेअर्स चक्क तेजीत पूढे सरकतांना दिसत आहे.

Share Market : गेल्या अनेक दिवसांपासुन शेअर मार्केट मध्ये प्रचंड अस्थिरता जाणवत आहे. तरीदेखील फिलाटेक्स इंडिया (Filatex India) या कंपणीच्या समभागात सोमवारी चक्क 9 टक्कयांनी वाढ झालेली दिसुन आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांआधी या कंपनीच्या शेअर्स मध्ये देखील चढ-उतार कायम होता. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्सने एकदम उसळी मारली. फिलाटेक्स इंडिया कंपनीची एकुण मार्केट कॅप 1553.20 कोटी रुपये आहे. आणि सध्या या कंपनीचे शेअर्स BSE वर 35.06 रुपयांवर व्यवहार करीत आहे.

फिलाटेक्स इंडिया (Filatex India)चे कार्य

Filatex India Limited प्रामुख्याने भारतात पॉलिस्टर फिलामेंट यार्नचे उत्पादन आणि विक्री करते. ही कंपनी पॉलिस्टर धागा तयार करते. ऑटोमोटिव्ह उत्पादने, फर्निशिंग फॅब्रिक्स, शिवणकामाचे धागे, शर्टिंग आणि ब्लाउज, शूलेस आणि ताडपत्री तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या एअर टेक्सचर यार्न; आणि सॉक्स, अंडरगारमेंट्स, स्पोर्ट्सवेअर, विणलेल्या सॅक, जिओटेक्स्टाइल्स, सोफा सेट, सेफ्टी बेल्ट, शिवणकामाचा धागा आणि दोरी यांच्या शिलाईमध्ये वापरण्यासाठी पॉलीप्रॉपिलीन यार्न तयार करते. याशिवाय, कंपनी अरुंद विणलेले कापड ऑफर करते जे वस्त्र उद्योगात टोपी, कॉर्सेट आणि अंतर्वस्त्र आणि लष्करी गणवेश तयार करण्यासाठी वापरले जातात. आणि विशेष उत्पादने, ज्यात Filigree, Ocean, Chubby Yarn, Cotslon, Soie FIL आणि Flexi FIL यांचा समावेश आहे. तसेच ही कंपनी अंदाजे 45 देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. कंपनीची स्थापना 1990 मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय नवी दिल्लीला आहे.

गुंतवणूकदार बनले करोडपती

फिलाटेक्स इंडियाच्या शेअर्समध्ये देखील मधल्या काळात प्रचंड चढउतार आले. मात्र लॉन्ग टर्मसाठी (दिर्घकाल गुंतवणूक) गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज करोडपती झाले आहेत. 12 एप्रिल 2002 ला फिलाटेक्स इंडियाचे शेअर लोकांनी 25 पैश्यांनी विकत घेतले. आणि सद्य स्थितीत कंपनीचे शेअर 35.06 रुपये एवढ्या दरावर गेले आहेत.गेल्या 21 वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत 12540 एवढी वाढली आहे. जर एखाद्याने या शेअरमध्ये हजारो रुपये गुंतवणूक केली असेल, तर तो आज करोडपती झाला आहे, हे नक्की.

याच कंपणीचे शेअर्स आणखी वाढू शकतात

अनेक तज्ञांचे असे म्हणणे आहे की, फिलाटेक्स इंडिया या कंपनीच्या शेअर्सचे भाव आणखी वाढू शकतात. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी अद्यापही आपले पैसे यामध्ये गुंतवुन ठेवले आहेत, त्यांना पूढे आणखी जास्त लाभ होऊ शकतो.

मल्टीबॅगर स्टॉक कशाला म्हणतात

मल्टीबॅगर स्टॉक हे असे स्टॉक असतात, जे गुंतवलेल्या रकमेवर 1 टक्के पेक्षा अधिक परतावा देतात. हे परतावे फार कमी कालावधीत दिले जातात. म्हणूनच जे शेअर्स कमी कालावधीत प्रचंड परतावा देतात त्यांना 'मल्टीबॅगर रिटर्न स्टॉक' म्हणतात.

(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)