Mukesh Ambani Loan : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सने भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील हे सर्वात मोठे सिंडिकेटेड कर्ज घेतले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि जिओने बॅक टू बॅक फॉरेन करन्सी लोन म्हणून 5 बिलियन डॉलर जमा केले आहेत. रिलायन्सने 55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर आणि जिओने पुन्हा 18 बँकांकडून 2 अब्ज डॉलर अतिरिक्त जमा केले.
Table of contents [Show]
कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे कर्ज
2020 मध्ये, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील तेल आणि दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स डस्ट्रीजने राईट इश्यू आणि गुंतवणुकीद्वारे 1.68 लाख कोटी रुपये उभारल्यानंतर त्यांनी सर्व कर्जामधुन मुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हे आता घेतलेले सर्वात मोठे लोन आहे.
भारतात 5G कव्हरेजच्या विस्ताराला चालना
रिलायन्स इंडस्ट्रीजने 55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर आणि तिची उपकंपनी जिओने 18 सावकारांकडून 2 अब्ज डॉलर जमा करून कर्ज मंजूर केले. दोन्ही कर्जे समान अटींसह मान्य केल्या गेले आहे आणि रिलायन्सच्या भांडवली खर्चासह भारतात 5G कव्हरेजच्या विस्ताराला चालना दिल्या जात आहे.
एकूण 5 अब्ज डॉलरचे कर्ज उभारण्यात आले
रिलायन्स जिओ हा निधी भांडवली खर्चासाठी वापरणार आहे आणि जिओ ही रक्कम देशभरात 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी खर्च करेल. सुमारे दोन डझन तैवानच्या बँकांसह, तसेच बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole या जागतिक बँकांसह 55 बँकांकडून 3 अब्ज डॉलरचे कर्ज प्रामुख्याने उभारण्यात आले,असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राथमिक कर्जाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, अशाच अटींवर 55 बँकांकडून 2 अब्ज डॉलरचे नवीन कर्ज देखील उभारण्यात आले.
10 अब्जाधीशांमध्ये एकमेव भारतीय मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बँकिंग क्षेत्राशी असलेले सखोल संबंध आणि कर्ज परताव्याची हमी असल्याने एवढ्या प्रचंड रकमेचे कर्ज बँकांनी दिले. गौतम अदानी यांच्यावर आरोप सुरु झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम ठेवले. जगातील अव्वल 10 अब्जाधीशांमध्ये ते एकमेव भारतीय आणि सर्वात श्रीमंत क्रीडा मालक आहेत.