• 05 Feb, 2023 14:13

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mukesh Ambani Helped Rakhi Sawant: मुकेश अंबानी आले राखी सावंतच्या कठीण काळात मदतीला धावून

Mukesh Ambani Helped Rakhi Sawant

Image Source : http://www.zeenews.india.com/

Mukesh Ambani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश आहे. हे दिग्गज उदयोगपती अभिनेत्री राखी सावंतच्या कठीण वेळेत तिच्या मदतीसाठी धावून आले.

Mukesh Ambani Latest News: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत ही मराठी बिग बाॅसच्या रियालिटी शो मधून बाहेर पडली. या शो च्या टाॅप फायनलिस्टमध्ये तिचा समावेश होता. ती जवळपास नऊ लाख रूपये घेऊन टाॅप तीनच्या रेसमधून बाहेर पडली. मात्र बाहेर पडताच ती एका कठीण परिस्थितीचा सामना करीत आहे आणि यावेळी तिच्या मदतीला उदयोगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) धावून आले आहे.  

मुकेश अंबानी का आले धावून (Why did Mukesh Ambani help)

अभिनेत्री राखी सावंत ही बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. एकीकडे तिचे सात महिन्यापूर्वी झालेले लग्न व दुसरीकडे आजारी असलेली आई. सध्या तिची आई एका गंभीर आजाराचा सामना करीत आहे. आपल्या आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी तिला आणखी पैश्यांची आवश्यकता आहे. यासाठी तिने सोशलमिडीयाच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन केले होते. यानंतर तिची ही मदतीची ही हाक उदयोगपती मुकेश अंबानी यांच्यापर्यंत पोहोचली व त्यांनी तिला मदतदेखील केली. अंबानी यांच्या मदतीसाठी राखीने त्यांचे आभार मानले आहे. यासाठी तिने आपली भावना एका व्हिडीवोव्दारे व्यक्त केली आहे. राखी या व्हिडीओमध्ये म्हणते, "माझी आई एका गंभीर आजाराचा सामना करीत आहे. ती या आजारपणामुळे कोणालाही ओळखत नाही. आम्ही तिला दोन महिन्यांसाठी क्रिटीकेअर रूग्णालयात अॅडमीट केले आहे. या रूग्णालयाची फी जास्त होती, मात्र मुकेश अंबानी यांच्यामुळे हे चार्जेस कमी करण्यात आले आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानत आहे."

राखी सावंतच्या लग्नाची ही चर्चा (Rakhi Sawant's Marriage)

राखी सावंत व आदिल खान या दोघांचे सात महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. मराठी बिग बाॅस शो मधून बाहेर पडल्यानंतर राखीने सोशलमिडीयावर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत सर्वांनाच एक जबरदस्त धक्का दिला. मात्र हे लग्न झाल्याचे सुरूवातीला आदिल मान्य करीत नव्हता. यामुळे राखीने भावनिक होऊन अनेकदा मिडीयासमोर आपली बाजू मांडली. अखेर आदिलने लग्न झाल्याचे कबूल केले. त्यामुळे तिच्या लग्नाची ही चर्चा सोशलमिडियावर जोरदार सुरू होती.