Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे आपल्या व्यावसायातील यशाच्या निमित्ताने नेहमीच चर्चेत असतात. नुकताच चालु आर्थिक वर्षाच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या विविध घटकांनी उत्तुंग कामगिरी करत कंपनीच्या यशात चांगले योगदान दिलं आहे. व्यवसायासोबतच अंबानी कुटुंबिय सुद्धा विविध कारणास्तव माध्यमांचं लक्ष वेधत असतात. मात्र, आज मुकेश अंबानी यांची वेगळीच चर्चा रंगतेय ती म्हणजे त्यांच्या मित्रत्वाची. मुकेश अंबानी हे आपल्या व्यवसायाप्रमाणेच तेवढ्याच आपुलकीने आपली मैत्री सुद्धा जपतात.
मुकेश अंबानी यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला चक्क 1,500 कोटी रूपयाचं घर भेट म्हणून दिलं आहे. बसला ना आश्चर्याचा धक्का. हे घर मुंबईल्या प्राईम लोकेशनवर असून खूपच वैशिष्ट्यपूर्ण असं हे घर आहे. या घटनेमुळे मुकेश अंबानी आणि त्यांच्या मित्राच्या मैत्रीचे किस्से माध्यमांमध्ये चर्चिले जातायेत. तर पाहुयात कोण आहे हा मित्र आणि त्याला बक्षिस दिलेलं घर कसं आहे.
1500 कोटी रूपयाचं घर
मुकेश अंबानी यांनी आपला खास मित्र मनोज मोदी यांना हे 1500 कोटी रूपयाचं घर भेट म्हणून दिलेलं आहे. मुंबईल्या मलबार हिल भागातील नेपियन सी रोड वरील एक संपूर्ण 22 मजली इमारत ही मुकेश अंबानीने आपला मित्र मनोद मोदी याला बक्षिस दिले आहे. वृंदावन असं या इमारतीचं नाव आहे.
या घराची वैशिष्ट्ये
वृंदावन ही अमारत एकुण 1.7 लाख स्क्वेअर फुटची असून या इमारतीचा प्रत्येक मजला हा 8 हजार स्क्वेअर फुटचा आहे.एकुण 22 मजल्याची ही इमारत आहे. या भागात सध्या 45,100 ते 70,600 प्रती स्क्वेअर फुट दर सुरू आहेत. तरी या इमारतीची किंमत ही 1500 कोटी आहे. ही इमारत तलाटी अँड पार्टनर्स या कंपनीने डिझाईन केली आहे. इमारतीचे पहिले सात मजले हे कार पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या इमारतीमधलं काही फर्निचर हे खास इटलीवरून मागवण्यात आलं आहे. याशिवाय या घरामध्ये मिटींग रूम, पार्टी हॉल, स्पा, स्विमिंग पूल, होम थिएटर अशा सगळ्या आधुनिक सोई-सुविधा उपलब्ध आहेत.
कोण आहेत मनोज मोदी
मनोज मोदी ही मुकेश अंबानी यांचे वर्गमित्र. केमिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये दोघांनीही सोबत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मनोज मोदी यांनी मुकेश अंबानी यांना त्यांच्या व्यवसायात मदत करत त्याच ठिकाणी कामाला सुरूवात केली. रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रत्येक कामामध्ये मनोद मोदी यांचा सहभाग असतो. त्यामुळए अंबानी हे आपल्या या मित्राला उजवा हात म्हणून संबोधतात. रिलायन्स इंडस्ट्रीच्या अनेक महत्त्वपूर्ण करारांमध्ये मनोज मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान, मनोद मोदी यांनी महालक्ष्मी येथील रहेजा विवरेया इमारतीमध्येल 28 आणि 29 व्या मजल्यावर असलेले 2 हजार 597 स्क्वेअर फुटचे दोन्ही सदनिका 41.5 कोटीला विकले आहेत. त्यामुळे लवकरच ते आपल्या या 1,500 कोटी किंमतीच्या घरात वास्तव्यासाठी येणार आहेत.