Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Movie Ticket Offer: फक्त 100 रुपयात पाहा 'घर बंदूक बिरयानी’; दोन आठवड्यात कमावला इतका गल्ला!

Ghar Banduk Biryani Movie Offer

Image Source : www.lehren.com

Movie Ticket Offer: प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी झी स्टुडिओने (Zee Studio) एक खास ऑफर आणली आहे. आज (शनिवार, 15 एप्रिल) जवळच्या चित्रपटगृहात 'घर बंदूक बिरयानी'(Ghar Banduk Biryani) हा चित्रपट केवळ 100 रुपयात पाहता येणार आहे. ही ऑफर ठराविक कालावधीपुरती मर्यादित असणार आहे.

आटपाट प्रोडक्शन (Aatpat Production) आणि झी स्टुडिओ (Zee Studio) निर्मित 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट 7 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. झी स्टुडिओचे आर्थिक पाठबळ मिळाल्याने या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चित्रपटगृहात स्क्रिन उपलब्ध झाल्या, सोबतच महाराष्ट्र दौरा करत चित्रपटाचे दणक्यात प्रमोशनही करण्यात आले. ‘सैराट’ फेम आकाश ठोसर, सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, सायली पाटील यासारख्या दर्जेदार कलाकारांनी यामध्ये स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला, तर प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी या चित्रपटासाठी गाणी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाने 2 आठवडे दमदार गाजवल्यानंतर आता झी स्टुडिओने रसिक प्रेक्षकांसाठी आज (शनिवार,15 एप्रिल) एक खास ऑफर आणली आहे. केवळ 100 रुपयांमध्ये प्रेक्षकांना 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट पाहता येणार आहे.

केवळ 100 रुपयात पाहता येणार 'घर बंदूक बिरयानी'

झी स्टुडिओने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार प्रेक्षकांना शनिवारी (दि. 15 एप्रिल) जवळच्या चित्रपटगृहात 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट फक्त 100 रुपयात पाहता येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना  bookmyshow आणि Paytm वरून तिकीट बुक करावे लागणार आहे. या ऑफरचा लाभ प्रेक्षकांना केवळ आजच घेता येणार आहे. दमदार 2 आठवड्यानंतर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी झी स्टुडिओकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हा विकेंड प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा ठरेल.

दोन आठवड्याची कमाई जाणून घ्या

'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट 7 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मीडियाद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यात चित्रपटाने 3 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. आता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ‘100 रुपये तिकीट’ असा अनोखा उपक्रम झी स्टुडिओकडून राबवण्यात येत आहे. यापूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी असे उपक्रम राबवले असून त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.