Moto G72 will be launched: Motorola 3 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात आपला नवीन G मालिका स्मार्टफोन Moto G72 लॉन्च करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चिंग आणि फीचर्सची माहितीही देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या या नवीन जी सीरीज स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा तसेच 5000mAh बॅटरी आहे. यासोबतच यामध्ये 33W चा फास्ट चार्जर देखील दिला जात आहे. Motorola G72 स्मार्टफोन Meteorite Gray आणि Polar Blue कलर मध्ये उपलब्ध असणार आहे.
Moto G72 चे फीचर्स (Features of Moto G72)
Moto G72 चे डिस्प्ले सेंटर पंच-होल POLED ने equipped असणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे, 1300 निट्स ब्राइटनेस या नवीन फोनच्या डिस्प्लेमध्ये HDR10 सपोर्ट उपलब्ध असेल. Motorola G72 स्मार्टफोन अनलॉक आणि ऍक्सेस करण्यासाठी इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP52-रेट केलेले वॉटर-रेपेलेंट आहे.
Motorola G72 ला 108MP कॅमेरा….….. (Motorola G72 has a 108MP camera…..)
फोटोग्राफीसाठी, Motorola G72 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (Triple rear camera setup) असणार आहे. ज्याचा फ्रंट कॅमेरा 108MP चा असून याशिवाय अल्ट्रा वाइड कॅमेरा बसवण्यात येणार आहे. ज्यामध्ये दोन सेन्सर - डेप्थ सेन्सर आणि मॅक्रो सेन्सर स्थापित केले जातील. MediaTek Helio G99 चिपसेटचा प्रोसेसर Moto G72 स्मार्टफोनमध्ये आढळू शकतो. 6GB LPDDR4X रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. tत्याचबरोबर या फोनमध्ये आउट-ऑफ-द-बॉक्स Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आणि 5,000mAh बॅटरी देखील मिळेल. फोनसोबत 33W चा फास्ट चार्जर देखील उपलब्ध असेल. यात डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह दोन मोठ्या आकाराचे स्पीकर्स असतील.