Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Expensive Bike Helmet: सगळ्यात महागड्या हेल्मेटबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? त्या किंमतीत येईल नवीन गाडी

Most Expensive Bike Helmet

Image Source : www.fortamoto.com

Most Expensive Bike Helmet: 'AGV Pista GP RR Futuro Carbon' हे हेल्मेट तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता.

Most Expensive Bike Helmet: हल्ली आपल्या प्रत्येकाकडेच बाईक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हेल्मेट खरेदी करायचे असेल तर लोकल मार्केटमध्ये तुम्हाला ते 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळते, याउलट चांगल्या दर्जाचे हेल्मेट 1000 ते 3000 रुपयांना मिळते. जर आपल्याला कोणी विचारलं की सर्वात महागड्या हेल्मेटची किंमत किती असेल? तर आपण 7000 किंवा 10,000 पर्यंत विचार करू शकतो. पण तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसेल की जगातील सर्वात महागड्या हेल्मेटच्या किमतीत चक्क एक नवीकोरी गाडी खरेदी करता येऊ शकते. ‘AGV Pista GP RR Futuro Carbon’ नावाच्या कंपनीचे हे हेल्मेट 1,34,120 रुपयांचे आहे. हे हेल्मेट इतके महाग का? आणि त्याच्यात कोणते फीचर्स देण्यात आलेत चला जाणून घेऊयात.  

AGV Pista GP RR Futuro Carbon हेल्मेटची किंमत आणि खासियत काय?

‘AGV Pista GP RR Futuro Carbon’ हे हेल्मेट तुम्ही कंपनीच्या www.fc-moto.de  या ऑनलाईन वेबसाईटवरून खरेदी करू शकता. त्याठिकाणी हेल्मेटची किंमत 1,34,120 रुपये सूचीबद्ध केली आहे. 15 टक्क्यांच्या सवलतीनंतर त्याची किंमत 1,13,946 रुपये इतकी होते. हे हेल्मेट भलेही सामान्य हेल्मेटसारखे दिसत असले तरीही ते मजबूत आणि बऱ्याच फीचर्ससह सुसज्ज आहे. गंभीर अपघातातही तुमच्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी या हेल्मेटमध्ये FIM homologation देण्यात आले आहे.

AGV Pista GP RR Futuro Carbon हेल्मेटमध्ये कोणते फीचर्स दिलेले आहेत?

  • यामध्ये 5 फ्रंट व्हेंट्स, 360° अडॅप्टिव्ह फिट, 3-पीस अ‍ॅडॉप्टिव्ह क्राउन पॅड फिट, डिटेचेबल प्रो स्पॉयलर रेसिंग फिट, 85 डिग्री व्हर्टिकल फील्ड व्ह्यू, पेंडेंट व्हिझर लॉक सिस्टम, 3-पीस अ‍ॅडॉप्टिव्ह क्राउन पॅड देण्यात आलेले आहे 
  • फिट, ऑप्टिक क्लास 1, 5 मिमी पातळ व्हिझर, 2 रीअर एक्स्ट्रॅक्टर्स, चीक पॅड्स सेफ्टी रिलीझ सिस्टम, मेटल एअर व्हेंट्स आणि एक्स्ट्रॅक्टर्स, काढता येण्याजोगे नोज गार्ड, 190 डिग्री हॉरिझॉन्टल फील्ड व्ह्यू, मायक्रो ऑपरेटिंग सिस्टम आणि इतर अनेक फीचर्स यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत
  • हे शुद्ध कार्बन टायटॅनियम डबल डी रिंग उपकरण 5-घनता EPS 4 शेलच्या आकारात तयार केले असून याचे वजन 1450 ग्रॅम आहे
  • यामध्ये व्हिझर इलेक्ट्रो इरिडियम, 100% मॅक्स व्हिजन पिनलॉक, व्हेंट कव्हर, इंटीरियर कस्टमायझेशन किट, टॉप क्राउन पॅड, रिअर क्राउन पॅड, हायड्रेशन सिस्टम देण्यात आलेली आहे