ऑनलाईन बॅंकिंग (Online Banking) म्हणजेच इंटरनेट बॅंकिंग (Internet Banking). ऑनलाईन बॅंकिंग हा आताच्या Digital World मधला पर्वणीचा शब्द बनला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात आणि उद्योगांमध्ये डिजिटल क्रांतीचा शिरकाव झाला असला तरी बँकिंग क्षेत्रात त्याचे अस्तित्व Game Changer सारखे असल्याचे झाले आहे. ऑनलाईन बँकिंगने सर्वसामान्यांच्या बँकिंग व्यवहाराच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. कारण ऑनलाईन बँकिंगद्वारे ग्राहक बॅंकेच्या सर्व सुविधांचा ऑनलाईन लाभ घेऊ शकतात. इंटरनेट बँकिंगमुळे ग्राहकांना बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय स्वतःहून आर्थिक व्यवहार करता येतात. चांगल्या इंटरनेट कनेक्शनचा वापर करून ग्राहक Internet Banking Portal Access करतात. Customer ID आणि Password च्या माध्यमातून त्यात log in करतात आणि नंतर इंटरनेट बँकिंगने दर्शवलेल्या पर्यायांमधून बॅंकेशी संबंधित वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेता येतो.
• Internet banking चे अनेक फायदे आणि काही मर्यादा आहेत.
• Internet banking आपल्याला web वरील बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते.
• आपण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय fund transaction सुरू करू शकता, bill payments आणि mutual funds मध्ये गुंतवणूक करू शकता.
• Online transactions, payments and deposits, check account balance, insurance and loan payments आणि open fixed deposit account करण्याची ऑर्डरही आपण देऊ शकतो. सुचविलेल्या सुरक्षा उपायांचे पालन न केल्याबद्दल सायबर गुन्हे हा इंटरनेट बँकिंगचा सामान्य तोटा आहे.
Table of contents [Show]
Internet banking चे फायदे
पैसे ट्रान्सफर करणे (Transferring Funds)
Internet banking मुळे तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे transfer करू शकता. आपण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर inter आणि intrabank funds transaction करू शकता. NEFT, RTGS आणि IMPS सारख्या Money transfer चॅनेलचा वापर करून आपण एका तासात पैसे पाठवू शकता.
बिले भरणे आणि रिचार्ज करणे (Payments of bill and Recharging)
आपण आपल्या घराच्या वीज, टेलिफोन, गॅस इत्यादी utility bills भरू शकता आणि auto debit पर्याय कधीही चुकवू शकत नाही. आपण आपल्या internet banking account द्वारे आपला मोबाईल आणि डीटीएच कनेक्शन रिचार्ज करू शकता.
अकाऊंटचा आढावा आणि तपासणी (Tracking account and checking balance)
खातेधारक कोठूनही आणि कोणत्याही वेळी आपले account track करू शकतो. खातेधारक भारतातून किंवा परदेशातूनही अकाऊंटमधील शिल्लक तपासू शकतो. Internet baking portal वरील “view account statement” या विभागांतर्गत अकाउंटधारक मागील वर्षांची statements किंवा account statements डाउनलोड करू शकतो.
add-ऑन सेवा (add on services)
आपण Mutual Funds खरेदी-विक्री, Insurance Policy खरेदी करणे आणि विविध प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करणे यासह विविध प्रकारच्या add on services चा आनंद घेऊ शकता. आपले इंटरनेट बँकिंग खाते आपल्याला सर्व खर्चासाठी auto payment set करण्यास अनुमती देते.
Internet banking चे तोटे
इंटरनेटची गरज (Internet Connection Must)
चांगले इंटरनेट कनेक्शन नसेल तर Internet Banking च्या सेवांमध्ये अडथळा येऊ शकतो. जेव्हा bank server down असतात तेव्हा देखील याचा फटका बसू शकतो.
इंटरनेट फ्रॉड (Internet Fraud)
सुरक्षिततेच्या दृष्टिने स्ट्रॉंग Password set न करणे, Password कोणालाही शेअर करणे किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करत असताना योग्य पद्धतीने खात्यातून log out न करणे, यासारख्या सुरक्षा उपायांचे पालन न केल्यास खातेधारक Internet Fraud चे शिकार होऊ शकतात.
ट्रान्सफर लिमिटेशन्स (Limitations of Transfer)
बँकांनी restrict केल्यानुसार इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून किती रक्कम transfer करायची, यावर काही बंधने आहेत. तसेच ज्यांना पैसे transfer करायचे आहेत; त्यांचा बॅंकिंग तपशील सक्रिय (Active) असणे गरजेचे आहे.