Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile Manufacturing: मोबाइल निर्मिती कंपन्यांमध्ये नोकरीची संधी! वर्षभरात 60 हजार जॉब तयार होणार

job openings in mobile manufacturing

Image Source : www.businesstoday.in

मोबाइल निर्मिती कंपन्यांमध्ये पुढील वर्षभरात 60 हजार प्रत्यक्ष नोकरीच्या संधी तयार होतील, असा अंदाज आघाडीच्या मनुष्यबळ पुरवठा कंपन्यांनी वर्तवला आहे. मोबाइल निर्मितीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात 200 पेक्षा जास्त निर्मिती प्रकल्पात ही भरती होईल.

Mobile Manufacturing companies job: देशभरात मोबाइल निर्मिती कंपन्यांमध्ये पुढील वर्षभरात सुमारे 60 हजार प्रत्यक्ष नोकरीच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. इंजिनिअर, टेक्निशियन, टेस्टर, QC सह मॅनेजर पदावरील अनेक जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. मोबाइल निर्मितीमध्ये जगभरात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कंत्राटी पद्धतीने मोबाइल निर्मिती करण्याचे मोठे प्रकल्प भारतात उभे राहत आहेत. त्यात अॅपल कंपनीसुद्धा आघाडीवर आहे. Teamlease Services आणि Ciel HR Services या मनुष्यबळ पुरवठा (स्टाफिंग) कंपन्यांनी पुढील वर्षभरात सुमारे 60 हजार नोकऱ्या तयार होतील, असा अंदाज वर्तवला आहे. 

मनुष्यबळ पुरवठा कंपन्यांकडून कर्मचारी भरती सुरू  

मोबाइल कंपन्या कर्मचारी भरतीचे काम मनुष्यबळ सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे देते. सध्या Teamlease Services कंपनीद्वारे 5 हजार कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. तर  Ciel HR Services ही कंपनी 2 हजार कर्मचारी मोबाइल निर्मिती कंपन्यांना पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील वर्षभरात 60 प्रत्यक्ष तर 1 लाखांपेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज मनुष्यबळ पुरवठा कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

कंत्राटी उत्पादन कंपन्यांकडूनही कर्मचारी भरती  

मोबाइल निर्मितीमधील बड्या कंपन्या भारतात प्रकल्प सुरू करण्याच्या तयारी आहेत. सोबतच सुटे पार्ट, अॅसेंब्ली उद्योगही उभे राहत आहे. अॅपल मोबाइलच्या कंत्राटी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या जसे की, फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगॉट्रॉन या कंपन्याचे नवे प्रकल्प देशात उभे राहिले आहेत. त्यांच्याकडून निर्मिती क्षमता वाढवण्यात येत आहे.

सोबतच डिक्सॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सूटे भाग आणि इतर अॅक्सेसरीज निर्मितीमध्ये काम वाढवत असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची गरज पडेल, असा अंदाज HR सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांनी वर्तवला आहे.  

मोबाइल निर्मितीचे 200 प्रकल्प 

देशभरात मोबाइल निर्मिती संबंधी 200 प्रकल्प आहेत. दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. चालू वर्षात भारतात 27 ते 30 कोटी मोबाइल फोनची निर्मिती होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जगभरातील कंपन्या निर्मितीसाठी चीनपेक्षा भारताला प्राधान्य देत आहेत. तसेच सरकारचाही यास पाठिंबा आहे. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी सरकारकडूनही मदत पुरवण्यात येत आहे. 

टाटा इलेक्ट्रॉनिक्स कर्नाटकातील विस्ट्रॉन कंपनीचा मोबाइल निर्मिती प्रकल्प ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. तर होसुर येथे स्वत:चा वेगळा निर्मिती प्रकल्प उभारत आहे. टेक्निकल आणि मॅनेजर पदावरील अनेक नोकरीच्या संधी तरुणांना येत्या काळात उपलब्ध होतील.