Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: रिटायरमेंट प्लॅनिंग करताना 'या' चुका करू नका

Mistakes in Retirement Planning

निवृत्तीनंतरच्या काळाला "गोल्डन इयर्स ऑफ लाइफ" असेही म्हणतात. त्यामध्ये तुम्ही आनंद आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला हवे, ना की चिंता आणि परावलंबन. रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक खर्च भागवण्याबरोबरच स्वत:ची स्वप्नेही पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच म्हणजे तरुण वयापासूनच बचत करायला हवी.

निवृतीनंतरचे आयुष्य सुखात घालवण्यासाठी योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. कारण, नोकरी करत असताना साठवलेली रक्कम चुकीच्या निर्णयांमुळे हातातून निसटू शकते. निवृत्तीनंतरच्या जीवनाला "गोल्डन इयर्स ऑफ लाइफ" असेही म्हणतात. त्यामध्ये तुम्ही आनंद आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला हवे, ना की चिंता आणि परावलंबन.रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक खर्च भागवण्याबरोबरच स्वत:ची स्वप्नेही पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच म्हणजे तरुण वयापासूनच बचत करायला हवी. निवृत्तीचे नियोजन करताना खाली दिलेल्या चुका तुम्ही कटाक्षाने टाळायला हव्यात.

पुरेसा निधी निवृत्तीसाठी न ठेवणे -

निवृत्तीकाळासाठी बचत ही दीर्घकाळासाठी प्रक्रिया आहे. त्यासाठी तुम्ही दरमहा पगारातुन काही रक्कम बचत करा. मात्र, वाढती महागाई, वैद्यकीय गरजा, कौटुंबिक खर्च या अंदाज घेऊन किती पैसे आपल्याला लागेल याचा अंदाज बांधा. अन्यथा तुम्ही बचत केलेले पैसे अपुरे पडतील. तुम्ही या आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करता ते किती सुरक्षित आहेत याची संपूर्ण माहिती घ्या. उतारवयाच जोखीम घेण्याची क्षमता कमी झालेली असते. अनेक सरकारी आणि खासगी आर्थिक संस्थाच्या योजना निवृत्तीनंतर महिन्याला गुंतवणुकीवरील परतावा देतात.

वैद्यकीय खर्चाकडे दुर्लक्ष करणे - 

जसे तुमचे वय वाढत जाते तसे आरोग्याच्या समस्या मागे लागतात. निवृत्तीनंतर म्हणजे ६० वर्षानंतर तर जोखीम आणखी वाढते. कँन्सरसारख्या गंभीर आजारांचा खर्चही खुप मोठा असतो. त्यासाठी फक्त बचतीवर अवलंबून राहू शकत नाही. तरुण वयापासूनच तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा ज्यामध्ये गंभीर आजारही कव्हर असतील. त्यामुळे तुम्हाला बचतीमधून पैसे खर्च करण्याची गरज नाही.

रिटायरमेंट फंडातून आधीच पैसे काढून घेणे टाळा -

रिटायरमेंटसाठी जे पैसे तुम्ही बचत करत आहात त्यातुन गरज नसताना पैसे काढून घेऊ नका. त्यावर तुम्हाला अधिकचा करही भरावा लागू शकतो. तसेच निवृत्तीनंतर पुरेसे पैसेही फंडात राहणार नाहीत. त्यामुळे बचतीचे टप्पे ठरवून घ्या. जसे की ४० वर्षांपर्यंतचा पहिला टप्पा. यामध्ये बचत केलेल्या पैशातून तुम्ही घर खरेदी, किंवा अत्यंत गरजेची दुसरी कोणताही खर्च करू शकता. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात आणखी काही पैसे बचत कर शकता.

निवृत्तीनंतरही कर्जाचा भार -

निवृत्तीनंतर तुमच्याकडे महिन्याला उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसेल. जे काही पैसे तुम्हाला मिळतील ते बचत फंडावरील व्याज किंवा इतर मालमत्तेतून मिळणारा नफा. अशा परिस्थितीत तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर तुम्हाला आर्थिक अडचण येऊ शकते. मात्र, उतारवयात तुमच्यापुढे इतरही अडचणी उभ्या राहिल्या तर तुम्हाला कर्जाचे हप्ते भरणे अशक्य होऊ शकते. तुमच्या मृत्यूपश्चातही खात्रीशीर उत्पन्न कुटुंबीयाना मिळत राहील, अशा योजनेमध्ये तुम्ही गुंवतणूक करायला हवी.

निवृत्तीचे नियोजन करण्यास टाळाटाळ -

शिक्षण पूर्ण करून नोकरीस लागल्यानंतर काही वर्षातच म्हणजे तीस वर्षांच्या आतच तुम्ही निवृत्तीसाठी बचत करण्यास सुरुवात केलेली योग्य राहील. बचत करण्यास आणखी खूप वर्ष बाकी आहे, पुढे पाहू, ही मानसिकता तुम्हाला धोकादायक ठरेल. त्यामुळे जेवढे लवकर गुंतवणूक सुरू कराल तेवढा त्यावर परतावाही मिळेल. चक्रवाढ व्याजने पैशांची वाढ जास्त होते. तुम्ही जेवढा उशिर कराल तेवढा तुमचा फायदा होण्याची शक्यता कमी होत जाते. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सरकारी रोखे, निवृत्तीसंबंधीत सरकारी योजना यामध्ये तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे.