म्युच्युअल फंडात दिर्घकालीन गुंतवणूक करुन आर्थिक उद्दिष्ट गाठणाऱ्यांसाठी मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंड (Mirae Asset Emerging Bluechip Fund) एक चांगला पर्याय ठरु शकतो. मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंडाने मागील 10 वर्षात गुंतवणुकीवर सरासरी 20.31% परतावा दिला आहे. हा फंड निफ्टी बेंचमार्क लार्जकॅप 250 (TRI)ला ट्रॅक करतो.
मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंडाने 3 वर्षात सरासरी 20% रिटर्न दिला आहे. त्याशिवाय 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्षात या फंड योजनेने बेंचमार्क निफ्टी लार्जकॅप इंडेक्सच्या तुलनेत सरस परतावा दिल्याचे आकडे सांगतात. या फंडात एकरकमी आणि एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंड हा निलेश सुराणा आणि अंकित जैन या फंड व्यवस्थापकांकडून हातळला जातो. मात्र गेल्या वर्षात मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंडाची कामगिरी निराशाजनक राहिली. या फंडाने मागील एक वर्षात उणे 8.70% इतका रिटर्न होता तर याच काळात या फंडाचा बेंचमार्कने उणे 3.64% इतका रिटर्न दिला.
व्हॅल्यू रिसर्च या कंपीने मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंडाला फाईव्ह स्टार रेटिंग दिले आहे. हा लार्ज आणि मिडकॅप श्रेणीमध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड आहे. या फंडाची एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक आहे. या फंडाची 35 ते 65% गुंतवणूक ही लार्ज कंपन्यांमध्ये केली जाते. खालच्या स्तरावर गुंतवणूक करण्याची रणनिती फंड व्यवस्थापकांकडून अवलंबण्यात येते. मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंडामध्ये रेग्युलर प्लॅनसाठी एक्सपेन्स रेशो 1.66% आणि डायरेक्ट प्लॅनसाठी 0.68% इतका आहे.