Minor rise in crypto coins: 2023 नव्या वर्षाची सुरुवात क्रिप्टोसाठी फारशी ग्रेट नव्हती. महत्त्वाच्या क्रिप्टो नाण्यांमध्ये किरकोळ वाढ दिसून आली आहे. एकूणच क्रिप्टोमार्केटमध्ये कासवाच्या गतीने व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे. जागतिक क्रिप्टो मार्केट कॅपिटल 798.79 बिलियन युएस डॉलरवर आहे. मागील चोवीस तासांत 0.60 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे.
2022 वर्षाच्या उत्तरार्धापासून क्रिप्टो नाण्यांच्या किंमतीत किरकोळ चढ-उतार झाली असली तरी त्याने नाण्याच्या किंमतीत फार मोठी उलधापालध झालेली नाही. त्यामुळे बऱ्यापैकी नाण्यांच्या किंमती स्थिर आहेत. येत्या काळात क्रिप्टोविषयी नागरिक आणि गुंतवणुकदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे महत्त्वाचे आहे, असे क्रिप्टो सल्लागार अमोल सरकार यांनी सांगितले.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -
बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत नवर्षाच्या पहिल्या वर्किंग डेच्या दिवशी म्हणजे 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 646 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.70 टक्के घसरण झाली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.33 लाख एवढा आहे.
इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांमध्ये 0.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या नाण्याची किंमत आज सकाळी 10 वाजता 1 हजार 201.14 युएस डॉलर किंमतीवर ट्रेड करत होती. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.04 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.06993 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 0.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डॉजकॉईनची किंमत 6.16 रुपये आहे.
लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 1.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या नाण्याची किंमत 70.40 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 6 हजार पूर्णांक 8 रुपये आहे.
रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3273 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 2.97 टक्क्यांनी घसरली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 28.29 रुपये एवढी आहे.
सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 1.06 टक्क्यांची वाढ झाली असून, याची किंमत 9.97 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 880.41 रुपये एवढी आहे.