Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Crypto Market : क्रिप्टोमध्ये महागाईविरोधात हेजिंगची क्षमता नाही - रिझर्व्ह बँक

Cryptocurrency

Indian Crypto Market : मागच्या दोन वर्षांत क्रिप्टो बाजारपेठेचा विकास झाला तेव्हा व्याजदर वाढत असताना क्रिप्टोमधली गुंतवणूक महागाई विरोधात संरक्षण देईल असा गुंतवणूकदारांचा आणि कज्ज्ञांचा होरा होता. पण, हे उद्दिष्ट फसल्याचं आता रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात स्पष्ट केलंय

क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) गुंतवणुकीचं साधन (Asset Class) म्हणून विचार करणाऱ्यांसाठी आणखी एक निराशाजनक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) आपल्या ताज्या अहवालात क्रिप्टो बद्दल भाष्य करताना महागाईपासून संरक्षण देण्यात क्रिप्टोकरन्सी अपयशी ठरल्याचं नमूद केलंय.     

महागाईविरोधात संरक्षण (Inflation Hedging) म्हणजे देशातला महागाई दर आहे, त्यापेक्षा जास्त परतावा तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून मिळाला पाहिजे. तर भविष्यात महागाईला आपण तोंड देऊ शकू. क्रिप्टोकरन्सीचा विकास झाला तेव्हा क्रिप्टोकडून काही तज्ज्ञांना तशी अपेक्षा होती. पण, क्रिप्टोतले जगभरात झालेले घोटाळे आणि त्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेली न भूतो न भविष्यती पडझड यामुळे गुंतवणुकीचं साधन म्हणून क्रिप्टोवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.      

अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातलं पुढचं संभाव्य मोठं संकट क्रिप्टोमधल्या घोटाळ्यातून येऊ शकेल असं वक्तव्य केलं होतं. आणि आता रिझर्व्ह बँकेनंच सादर केलेल्या अहवालात क्रिप्टोकडे महागाईविरोधात संरक्षण देण्याची क्षमता नाही, असं नमूद करण्यात आलं आहे.      

इतकंच नाही, तर अलीकडे क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल टोकन्समध्ये वाढलेले चढउतार आणि करन्सी, टोकन तसंच क्रिप्टो एक्सचेंज बंद पडण्याची वाढलेली प्रकरणं पाहता क्रिप्टोवर सरकारी नियंत्रण आणण्याची गरजही या अहवालात बोलून दाखवण्यात आली आहे.      

‘महागाई वाढत असताना क्रिप्टोकरन्सी पडत होती, हे चित्र गुंतवणुकीसाठी आश्वासक नाही,’ असं या अहवालात म्हटलं आहे.      

मोबदल्यापेक्षा जोखीम अधिक More Risks Than Rewards    

नोव्हेंबर महिन्यात FTX हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं क्रिप्टो एक्सचेंज बंद झालं. तर अव्वल एक्सचेंज बिनान्समध्येही मोठी पडझड झाली आहे. टेरा आणि ल्युना ही क्रिप्टोकरन्सी तुलनेनं स्थिर मानली जायची. पण, गेल्यावर्षी अचानक ल्युना करन्सीच लुप्त झाली.      

या सगळ्या घडामोडींमधून क्रिप्टोकरन्सीमधली जोखीम दिसते. पण, त्या मानाने गुंतवणूकदारांना परतावा मिळालेला दिसत नाही, असं रिझर्व्ह बँंकेचं म्हणणं आहे.      

आणि अशा प्रकारचे चढउतार तसंच घोटाळे रोखण्यासाठी खासकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे, असं मध्यवर्ती बँकेनं पुन्हा एकदा नमूद केलंय.