2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय 19 मे रोजी घेतला. 23 मे पासून 2000 च्या नोटा देशातील बँकांमधून बदलून मिळतील असे सांगितले होते. त्यामुळे या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या 2000 च्या नोटा जमा करण्याचे आदेश RBI ने देशातील बँकांना दिले आहे.
76% नोटा बँकेत जमा
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात, चलनातून बाद करण्यात आलेल्या 2000 च्या नोट बाबत माहिती देतांना सांगितले की, 30 जून 2023 पर्यंत 2.72 लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांकडे जमा झाल्या आहेत. तर आरबीआयच्या रिपोर्टनुसार 2000 रुपयांच्या 76% नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. मे महिन्यात 2000 रुपयाच्या एकूण 3.56 लाख कोटी नोटा चलनात होत्या. तर आता जूनच्या शेवटपर्यंत त्यांची संख्या 84,000 कोटी रुपये एवढी राहीली आहे.
रोख रकमेचा तुटवडा जाणवला नाही
2000 च्या नोटा चलनातून बाद केल्या नंतर आणि बँकांकडे परत घेतल्यानंतरही मार्केटमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा भासला नाही. कारण 2000 च्या नोटांएवजी 500 रुपयांसह इतर किंमतीच्या नोटा उपलब्ध करण्यात आल्या होत्या, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले. तसेच 2000 च्या नोटा बदलवून घेण्याबाबतची शेवटची तारीख 30 सप्टेंबर ही आहे आणि त्यात कुठलाही बदल केला जाणार नसल्याची माहिती देखील अर्थ राज्य मंत्री यांनी दिली.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            