आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. RO, UV तसेच फिल्टर्ड पाणी पिण्याविषयी जागरुकता वाढली आहे.घरात असताना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करणे तुलनेने शक्य होते. मात्र प्रवासात बहुतेकदा पाण्याची बाटली विकत घेण्याला पसंती दिली जाते. बिसलेरी किंवा इतर मिनरल वॉटरचे पाणी विकत घेऊन तहान भागवली जाते. सरासरी 20 रुपये एक लीटर पासून सुरु होणारे प्रमुख ब्रॅंडविषयी माहिती घेऊया ज्यांनी मिनरल वॉटरची एक इंडस्ट्री उभी केली.
Table of contents [Show]
बिसलेरी (Bisleri)
कित्येक जण असे असतात की, पाण्याची बाटली किवा मिनरल वॉटर कोणते आहे, असे दुकानदाराला विचारण्याऐवजी एक बिसलेरी द्या, अशी मागणी करतात. वास्तविक यातल्या अनेकांना कोणतीही पाण्याची बाटली हवी असते. हा मूळचा इटालियन मिनरल वॉटर ब्रँड आहे. किरकोळ बाटलीबंद मिनरल वॉटर आणि सोडयाची विक्री ही कंपनी करते. कंपनीची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली. फेलिस बिसलेरी आणि जयंतीलाल चौहान हे संस्थापक आहेत. कंपनीचे स्वत:चे ऑनलाईन स्टोअर देखील आहे. 200 मिलीपासून ते 20 लीटर अशा पॅकिंगमध्ये उत्पादने आहेत. एक लीटर बिसलेरीचा भाव 20 रुपये आहे.
किनले (Kinley )
पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा भारतातील सर्वात मोठा वितरक म्हणून किनलेची ओळख आहे. हे कोका-कोला कंपनीच्या मालकीचे आहे. याचे युरोप आणि आशियामध्ये वितरण केले जाते. भारतात 2000 मध्ये किनले वॉटरच्या विक्रीला सुरुवात झाली. मात्र त्या पूर्वीपासून कोका-कोलाने कोल्ड्रिंकमुळे भारतात जम बसवला होता. त्यामुळे किनलेचे मार्केटिंग करणे त्यांना सोपे गेले. यामुळे विक्रीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या काळातच किनलेला यश मिळाले. एक लिटर किनलेची किंमत 20 रुपये आहे.
मिझू (Mizu)
वाराहीचा (Varahi) मिझू हा पॅकेज्ड वॉटरचा ब्रॅंड आहे. हा नैसर्गिक शुद्ध पाणी आणण्यासाठी ओळखला जाणारा ब्रॅंड आहे. मिझू हे त्याच्या ऑनलाइन प्रेजेन्ससाठी देखील ओळखले जाते. मिझूचा एक लीटरचा भाव 100 रुपये आहे.
वेदिका (Vedica)
वेदिका हा बिसलेरीचा नॅचरल मिनरल वॉटर ब्रँड आहे. हे हिमालय पर्वतरांगा येथील पाणी हा या ब्रॅंडचा पाण्याचा स्त्रोत आहे. मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स पाण्यातून जात नाहीत याची काळजी कंपनीकडून घेतली जाते. कंपनीकडून एक लीटरची विक्री 280 रुपयांना केली जाते.
अॅक्वाफिना (Aqafina)
पेप्सीकोच्या (Pepsico) मालकीचा Aquafina हा भारतातील एक प्रसिद्ध ब्रॅंड आहे. विक्रीच्या दृष्टीने देखील हा ब्रॅंड आघाडीवर आहे. युनायटेड स्टेटसमध्ये 1994 ला Aquafina च्या विक्रीची सुरुवात झाली. कॅन्ससमध्ये याचे हेड ऑफिसमध्ये आहे. हा ब्रॅंड जगात अनेक ठिकाणी विस्तारला यामागे प्रॉडक्टची गुणवत्ता असल्याचे मानले जाते. Aquafina च्या पाण्याला स्किनकेअर उत्पादनांमध्ये वापरण्याचाही परवाना आहे.
रेलनीर (Rail Neer)
रेल्वेने प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांनी या ब्रॅंडविषयी ऐकले असेलच. IRCTC नेच हा पॅकेज केलेला वॉटर ब्रॅंड लॉन्च केला. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे पाणी पुरविले जाते. भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर या पाणी बॉटल विक्रीसाठी उपलब्ध असतात. रेल नीरचा भाव 15 रुपये प्रती लीटर आहे.
नाथजल (NathJal)
रेल्वेच्या ‘रेलनीर’च्या धर्तीवर एसटीने ‘नाथजल’ सुरू केले. ‘रेलनीर’च्या एक लिटर बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये आहे. ‘नाथजल’च्या पाण्यासाठीदेखील हीच किंमत निश्चित करण्यात आली आहे. ‘नाथजल’चा खप वाढवण्यासाठी स्थानक-आगारांतील स्टॉलमध्ये हा ब्रॅंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.