म्हाडा (Mhada) या गृहनिर्माण संस्थेतील नवीन नियमांनुसार म्हाडा घरांसाठी आता लॉटरी काढणार आहे. म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आता कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यास अर्जदाराला घर मिळणार नाही यामुळे इच्छुक असाल तर लक्ष्यपूर्वक वाचा म्हाडाचे नवे नियम.
म्हाडाचे नवीन नियम
म्हाडाने दीर्घकाळानंतर मोठी लॉटरी काढली आहे. कोरोना महामारीनंतर प्रथमच म्हाडा ही बंपर लॉटरी घेऊन आले आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथे म्हाडाकडून ही लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ फेब्रुवारी ही आहे.
लॉटरीत नाव आल्यानंतर म्हाडातर्फे कागदपत्रांची पडताळणी होत असे. यात काही कागदांची कमतरता असल्यास अर्जदाराला मुदत दिली जात होती. मात्र, आता ही पद्धत ऑनलाइन झाल्यामुळे अर्जदाराला आधी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यास उशीर केल्यास चालणार नाही.
म्हाडाने या कारणामुळे नियमात केला बदल
म्हाडाची ही लॉटरी बहुआयामी असणार आहे. या लॉटरीमार्फत अल्प मध्यम व उच्च हे तिन्ही गट या लॉटरीसाठी पात्र असणार आहेत. म्हाडाद्वारे नियमात बदल करण्याचे मुख्य कारण भ्रष्टाचार व गैरप्रकाराला आळा घालणे हे आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा असल्यामुळे अर्जदाराला सोयीचे झाले आहे.