Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2023-24 या आर्थिक वर्षात म्हाडा 12,724 घरे उभारणार;म्हाडाचे 10186.73 कोटी रुपयांचे बजेट सादर

MHADA 2023-24 budget approve

Image Source : www.mhada.gov.in

MHADA Budget 2023-24: म्हाडाने गुरूवारी (दि. 6 एप्रिल) 10,186.73 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला असून, त्यातील तब्बल 5,800 कोटी रुपयांची तरतूद 12,724 घरे उभारण्यासाठी केली आहे.

MAHADA BUDGET 2023-24: म्हाडाने आगामी आर्थिक वर्षात 12,724 घरे उभारण्याचा मानस व्यक्त केला असून, 2023-24 या आर्थिक वर्षाचा म्हाडाने 10,186.73 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षात म्हाडा 12,724 घरे उभारणार आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2,152 घरे ही मुंबईत उभारली जाणार आहेत आणि त्यासाठी म्हाडाने 3664.18 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

म्हाडाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी बजेटमध्ये बऱ्यापैकी वाढ केली. मागील वर्षी म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षात म्हाडाने 6933.82 कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यात यावेळी तब्बल 3252.91 कोटी रुपयांची वाढ केली आहे. म्हाडाने गुरूवारी (दि. 6 एप्रिल) 2023-24 चा 10,186.73 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

12,152 घरांसाठी अर्थसंकल्पात 5,800 कोटींची तरतूद

म्हाडाने 2023-24 मध्ये एकूण 12,724 घरे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात सुमारे 5,800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या 12,724 घरांमध्ये मुंबईत 2,152 घरे उभारली जाणार असून, यासाठी 3664.18 कोटी रुपयांची तरतूद केली. मुंबईनंतर म्हाडा औरंगाबाद आणि नागपूरमध्ये अनुक्रमे 1497 आणि 1417 घरे उभारणार आहे.औरंगाबादमध्ये 1497 घरे उभारण्यासाठी म्हाडाने 212.08 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर नागपूर मध्ये 1417 घरांसाठी 417.55 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानंतर पुण्यामध्ये 862, नाशिकमध्ये 749 आणि अमरावतीमध्ये 433 घरे उभारली जाणार आहेत.

कोकण मंडळ साडेपाच हजार घरे उभारणार

म्हाडा कोकण मंडळांतर्गत 5,614 घरे उभारणार असून त्यासाठी म्हाडाने 741.36 कोटी रुपयांची तरतूद केली. त्याचबरोबर विरार बोळिंज, बाळकुम, माजिवाडा, मीरारोड येथे उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडाने अनुक्रमे 10 कोटी, 33 कोटी, 35 कोटी आणि 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबईतल्या विकासाची दिशा काय?

म्हाडाने बीडीडी पुनर्विकासासाठी 2285 कोटी रुपयांची तरतूद केली. तर खडकपाडा दिंडोशी येथील योजनेसाठी 18 कोटी रुपये, पहाडी गोरेगावसाठी 100 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) 300 कोटी रुपये, गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपये, धारावी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यासाठी 59 कोटी रुपये आणि पोलिसांच्या वसाहतींचे पुनर्विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली.