यूरोपीय संघाने सोशल मीडिया कंपनी मेटावर प्रतीस्पर्धा नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मेटाने सोशल मीडिया मंच फेसबूक चालवताना ऑनलाइन वर्गीकृत जाहिरात क्षेत्रात प्रतिस्पर्धा विरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे. अलीकडच्या कालावधीत प्रतिस्पर्धा नियम तोडण्यावरुन तुर्कीनेही मेटावर 153 कोटी रुपयांचा दंड लावला आहे.
युरोपमधील 27 देशांचे संगठन यूरोपीय संघाच्या कार्यकारी आयोगाने सोमवारी यासंबंधी भाष्य केले. ऑनलाइन वर्गीकृत जाहिरात क्षेत्र फेसबूक मार्केटप्लेसला फेसबूकशी जोडण्याशी संबंधित प्रकरण मेटाच्या उपस्थितीत विचारात घेतले आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मेटाला (Meta) लागू शकतो ‘एवढा’दंड
मेटाकडून आपल्या स्थानाचा दुरुपयोग करणे आणि प्रतिस्पर्धा नियमांचे उल्लंघन करणे या कारणांसाठी प्रतिस्पर्धी ऑनलाइन वर्गीकृत कंपनीवर अनुचित व्यापारी अटी सुद्धा लागू करू शकतो, असे आयोगाने याविषयी सांगितले आहे. मेटावर वार्षिक वैश्विक महसुलातील 10 टक्क्यापर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो.
मेटावर (Meta) तुर्कीकडूनही 153 कोटी रुपयांचा दंड
अलीकडच्या कालावधीत प्रतिस्पर्धा नियम तोडण्यावरुन तुर्कीनेही मेटावर 153 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. कंपनीवर जवळपास 346.72 मिलियन टर्किश लीरा म्हणजेच 18.63 मिलियन डॉलरचा दंड लावला होता. भारतीय रुपयात ही किमत जवळजवळ 153 कोटी इतकी होते.तुर्की प्राधिकरणाने याविषयी एक विधान केले आहे.
यात त्यांनी सांगितले की, कंपनी व्यक्तिगत सोशल नेटवर्किंग सर्व्हिस आणि ऑनलाइन विडिओ एडवरटाइजमेंट मार्केटमध्ये महत्वाच्या स्थानावर आहे आणि कंपनीने मुख्य सर्व्हिस फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून एकत्र केलेला डाटा मर्ज करून प्रतिस्पर्धेला बाधा निर्माण केली.