व्हीएलसीसीकडून उस्त्राचं संपादन झाल्यानंतर सध्याचे गुंतवणूकदार इन्फो एज (Info Edge), 360 वन (360 One) आणि विप्रो कन्झ्यूमर केअर व्हेंचर्स (Wipro Consumer Care Ventures) हे मुख्य कंपनी व्हीएलसीसीचे भागधारक बनतील. हा व्यवहार किती नेमका रुपयांना झाला, याबाबतची माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र एक माहिती अशी आहे, की या करारामध्ये रोख आणि शेअर स्वॅपिंगचं एकत्रीकरण असणार आहे. या माध्यमातूनच हे संपादन (VLCC to acquire Ustraa) पूर्ण केलं जाणार आहे.
Table of contents [Show]
व्हीएलसीसीचं निवेदन
व्हीएलसीसीनं एक निवेदन जारी केलं. त्यात म्हटलं, की या माध्यमातून कंपनी पुरुषांच्या ग्रूमिंग विश्वात पाऊल टाकणार आहे. नव्या गुंतवणुकीतून उस्त्रा ब्रँडला अधिक मोठं बनवलं जाईल. सध्या उस्त्राला मॅरिकोच्या समर्थनार्थ असणाऱ्या बिअरडोचं (Beardo) मोठं आव्हान आहे. या स्टार्टअपला आणखी काही ब्रँड्स टक्कर देत आहेत. मात्र व्हीएलसीसीच्या अधिग्रहणानंतर आता कंपनीच्या बाजारपेठेत वेगानं वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या माध्यमातून पर्सनल केअरशी संबंधित दोन ब्रँड एकत्र येत असल्याचं व्हीएलसीसीनं म्हटलं आहे.
उस्त्राची सुरुवात
उस्त्राची सुरुवात 2015मध्ये झाली. राहुल आनंद आणि रजत तुली यांनी याची स्थापना केली होती. ते पूर्वीप्रमाणेच कंपनीत काम करत राहणार आहेत. आता ते व्हीएलसीसीच्या डीटूसी म्हणजेच डायरेक्ट टू कन्झ्यूमर सेगमेंटचा अधिक विस्तार करणार आहेत. रजत तुली यांनी हॅपीली अनमॅरिड स्टार्टअपदेखील सुरू केलं आहे. उस्त्रानं ऑगस्ट 2022मध्ये इन्फो एजच्या (Info Edge) नेतृत्वाखालच्या फंडिंग राउंडमध्ये सुमारे 16.8 कोटी रुपयांचा निधी उभारला होता.
? VLCC has acquired men’s grooming line Ustraa for Rs200 crore.
— Aditi Shrivastava (@AditiS90) June 9, 2023
In August 2022, Ustraa raised funding at a valuation of Rs 422 crorehttps://t.co/3p1NQyjfoJ
कंपनीकडून 85 प्रकारची उत्पादनं
उस्त्रा कंपनीमध्ये सध्या सुमारे 85 प्रकारची उत्पादनं तयार केली जातात. यात सुगंध, केसांची निगा, चेहऱ्याची काळजी, दाढीची निगा यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. कंपनीच्या मते, त्यांच्या अॅपवर सुमारे 22 लाख ग्राहक आहेत. इन्फो एजशिवाय, 360 वन म्हणजेच पूर्वीचं आयआयएफएल व्हेंचर (IIFL Ventures) आणि विप्रोनंदेखील (Wipro) उस्त्रामध्ये गुंतवणूक केली आहे. तर उस्त्राच्या उत्पादनांची सुमारे 67 टक्के विक्री ऑनलाइन होते.
'आता ऑफलाइन डिस्ट्रीब्यूशनवर भर'
व्हीएलसीसीचे सीईओ यांनीही या डीलवर भाष्य केलंय. ते म्हणाले, की उस्त्राच्या वाढीमुळे विशेषतः डीटूसी (D2C) चॅनेलमध्ये आपण खूप आनंदी आहोत. दोन्ही संस्थापकांना डीटूसीची चांगली माहिती आहे. दोघंही डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून ब्रँडला वेगानं पुढे नेत आहेत. अल्पावधीत आम्ही पुढे जात आहोत. उस्त्राला आणखी मोठं करण्यासाठी व्हीएलसीसीच्या ऑफलाइन डिस्ट्रीब्यूशनच्या पर्यायाचा वापर केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
स्पर्धकांना टक्कर
सध्या उस्त्राचे विविध स्पर्धक आहेत. उस्त्रानंतर मेन्स ग्रूमिंग प्रॉडक्सना बाजारात मोठी मागणी आहे. त्याचमुळे सध्या उस्त्राला स्पर्धकही अधिक आहेत. यातले बरेच स्पर्धक ऑनलाइवर अधिक भर देत आहेत. उस्त्रा मात्र व्हीएलसीसीच्या माध्यमातून ऑफलाइन डिस्ट्रीब्यूशन वाढवणार आहे.