भारतातील उद्योगपती मेहुल चोक्सी यांनी भारतीय बॅंकेतून 7 हजार 848 कोटींचं सर्वाधिक कर्ज बुडवलं आहे. कर्जाची भरपाई न करता त्याने परदेशात पलायन केले आहे. देशातील सर्वाधिक कर्ज बुडविल्याला यादीमध्ये मेहुल चोक्सी याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
Table of contents [Show]
मेहुल चोक्सीने किती कर्ज घेतले होते?
पंजाब नॅशनल बँकेतून (Punjab National Bank) कर्ज घेऊन परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सीवर भारतीय बँकेतील सर्वाधिक कर्ज बुडवल्याचाही आरोप आहे. मेहुल चोक्सीने भारतीय बँकातून 7 हजार 848 कोटींचे कर्ज बुडवले आहे. सध्या तो एंटीगुआ येथे स्थायिक असून या देशाचे त्याच्याकडे नागरिकत्व देखील आहे.
चोक्सीसह इतर डिफॉल्टर्स (फसवणूक करणाऱ्यांची नावे)
31 मार्च 2022 पर्यंतचे देशातील 50 विलफुल डिफॉल्टर्सवर (Willful Defaulters) भारतीय बँकामध्ये एकूण 92 हजार 570 कोटींचं कर्ज आहे. यामध्ये गीतांजली जेम्सचे मेहुल चोक्सीसह अनेक मोठे डिफॉल्टर्स या यादीत आहे. जसे की, एरा इंफ्रा इंजिनिअरिंग (5,879 कोटी), री एग्रो (4,803 कोटी), कॉनकास्ट स्टील एंड पावर (3,311 कोटी), विनसम डायमंड्स एंड ज्वेरली (2,931 कोटी), रोटोमॅक ग्लोबल (2,893 कोटी), कोस्टल प्रोजेक्ट्स (2,311 कोटी) आणि जूम डेव्हलपर (2,147 कोटी) यांच्या नावांचादेखील समावेश आहे.
बॅंकानी किती कर्जावर सोडले पाणी
भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने 2 लाख कोटी कर्ज, पंजाब नॅशनल बँकने 67 हजार 214 कोटीं कर्ज, खासगी क्षेत्रातील आयसीआय बँकेने सर्वाधिक म्हणजे 50 हजार 514 कोटींवर तर एचडीएफसी बँकेने 34 हजार 782 कोटीं कर्जावर पाणी सोडले आहे.
मेहुल चोक्सीवर नवीन 3 गुन्हे दाखल
चोक्सी आणि इतर आरोपींमुळे विविध बँकेचे 6 हजार 746 कोटींचे नुकसान करण्याचा आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीविरोधात नुकतीच मोठी कारवाईदेखील करण्यात आली होती..