Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SpiceJet: शिलाँग-दिल्ली उड्डाण सेवेसाठी स्पाइसजेटशी करार, सेवा सोमवार आणि शुक्रवारी

SpiceJet

Image Source : www.bqprime.com

SpiceJet : मेघालय सरकारने शिलाँग-दिल्ली उड्डाण सेवेसाठी स्पाइसजेटशी करार केला आहे. ही सेवा सोमवार आणि शुक्रवारी उपलब्ध असेल.

मेघालय सरकारच्या (Meghalaya Govt) म्हणण्यानुसार, स्पाईसजेटने राज्य सरकारशी संपर्क साधला आणि विद्यमान MTC अटींनुसार स्वतःहून दिल्ली-शिलाँग-दिल्ली फ्लाइट चालवण्याची ऑफर दिली. मेघालय परिवहन महामंडळाने (MTC) शनिवारी स्पाईसजेटसोबत शिलाँग आणि दिल्ली दरम्यान थेट उड्डाण सेवा चालवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. आठवड्यातून दोनदा सोमवार आणि शुक्रवारी उड्डाणे सुरू होतील, अशी माहिती एमटीसीने (MTC) दिली आहे मेघालय सरकारच्या म्हणण्यानुसार, स्पाइसजेटने राज्य सरकारशी संपर्क साधला आणि सध्याच्या MTC अटींनुसार स्वतःहून दिल्ली-शिलाँग-दिल्ली फ्लाइट चालवण्याची ऑफर दिली.


स्पाइसजेटच्या ताफ्यात एकूण 23 बॉम्बार्डियर डॅश 8 Q400 विमाने आहेत. "तेच विमान दिल्ली-शिलाँग-दिल्ली मार्गासाठी तैनात केले जाईल," असे मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे. फेब्रुवारी 2023 पासून ही उड्डाणे सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवेदनात याविषयीची माहिती दिली आहे. स्पाईसजेट राज्य सरकारची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी आणि शिलाँग आणि दिल्ली दरम्यान थेट उड्डाणांसह मेघालयातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.2020 मध्ये दिल्ली-शिलाँग-दिल्ली थेट उड्डाणे चालवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता.

SpiceJet विषयी 

स्पाईसजेट ही भारतामधील सन समूहाची स्वस्त दरात वैमानिक वाहतूक देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.  चेन्नई, तामिळनाडू येथे या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे आणि गुरगांव, हरयाणा येथे वाणिज्यिक कार्यालये आहेत. कंपनीने वर्ष 2005 पासून विमानसेवा देण्यास सुरुवात केली आहे. सपाइसजेट कंपनीने 2012 पर्यंत, भारतातील व्यापारी बाजारपेठ काबीज करून  एर इंडिया, किंगफिशर एरलाईन्स आणि गोएरनंतर तिसरा क्रमांक मिळवलेला  आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूकीचे काम स्पाईसजेट करत असते. अहमदाबाद, आगरताळा, अमृतसर, बगदोगरा, बेंगळुरू, चेन्नई, कोईमतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जबलपूर, कोची, कलकत्ता, मदुराई, मुंबई, पुणे, विशाखापट्टण, तिरुंचिरापल्ली, तूतिकोरीन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय शहरांवरून या कंपनीची विमाने उड्डाण करत असतात.