मारुती सुझुकीचे हे दोन मॉडेल म्हणजे एस-प्रेसो (S-Presso) आणि इको (Eeco) ही आहेत. या वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड (Technical fault) असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तांत्रिक बिघाडाचा देशभरातल्या तब्बल 87,599 ग्राहकांना फटका बसला आहे. 87,599 यूनिट्स कंपनीनं परत मागवले आहेत. याविषयी कंपनीनं एक निवेदन जारी केलं आहे. या कारच्या स्टेअरिंग रॉडमध्ये (Steering rod) काहीतरी तांत्रिक समस्या असल्यानं विकल्या गेलेल्या सर्व कार रिकॉल करत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
Table of contents [Show]
कंपनीतर्फे ग्राहकांना मेसेज
ज्या कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं आहे, त्यांचं उत्पादन 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत करण्यात आलं होतं. मायक्रो एसयूव्ही एस-प्रेसो आणि युटिलिटी व्हेइकल इको या दोन गाड्या ज्या ग्राहकांना विकल्या गेल्या आहेत, त्यांना कंपनीतर्फे मेसेज पाठवण्यात येत आहे. त्यामुळे तुमच्याकडेदेखील हे मॉडेल असेल तर कंपनीशी त्वरीत संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Maruti Suzuki recalls 87,599 vehicles over possible defect in parts of steering tie rod
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2023
Read @ANI Story | https://t.co/uCQf08q2nr#MarutiSuzuki #Eeco pic.twitter.com/yxFNqe9usb
नेमकं काय म्हटलं कंपनीनं?
या दोन गाड्यांच्या स्टेअरिंग पार्टमध्ये तांत्रिक बिघाड असल्यानं त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: गाडी चालवत असताना हे स्टेअरिंग रॉड तुटण्याचाही धोका आहे. त्यामुळे चालकाचं नुकसान होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीनं कारमालकांनी सावध होणं गरजेचं आहे. 24 जुलै 2023 या तारखेपासून पुढे कंपनी संबंधित कारमालकांना यासंबंधीची मोफत सर्व्हिस देणार आहे.
मोफत सर्व्हिस
ज्यांच्याकडे या कार आहेत, त्यांना कंपनी स्वत:हून संपर्क साधत आहे. कंपनीच्या अधिकृत डीलरशीप, वर्कशॉपच्या माध्यमातून ग्राहकांना संपर्क साधला जात आहे. ग्राहकांनीही आपल्या वेळेनुसार तसंच वर्कशॉपच्या टाइमटेबलनुसार संपर्क साधून त्वरीत दुरुस्ती करून घ्यावी, असं कंपनीनं म्हटलं आहे.
एस-प्रेसो आणि इको
एस-प्रेसो ही एक एसयूव्ही कार असून 265.3 किमी प्रतिलिटर मायलेज, हाय स्पीड अलर्ट सिस्टम, ड्युअल एअरबॅग, पार्किंग स्टॅण्डर्ड त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट प्रोग्राम अशी काही फीचर्स आहेत. तर इको ही एक युटिलिटी व्हेइकल असून 13 व्हेरिएन्ट्समध्ये उपलब्ध आहे. किंमत 5.10 लाखांपासून सुरू होते.