• 03 Oct, 2022 22:36

मारुती सुझुकीचा शेअर 3 महिन्यांच्या उच्चांकावर; जाणून घ्या खरेदी-विक्रीबाबत तज्ज्ञांचं मत!

maruti suzuki shares india rise

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (MSIL) शेअर्स 6.3 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर खरेदी करावा की विकावा, याबाबत तज्ज्ञांचं मत समजून घेऊ.

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता असलेली कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (MSIL) शेअर्स मागील काही सत्रात बीएसईवर (Bombay Stock Exchange-BSE) 6.33 टक्क्यांनी वाढून 8,274.6 रुपयांवर बंद होण्यापूर्वी इंट्रा-डे ट्रेडमध्ये 8,319.80 रुपयांनी वाढला. 28 फेब्रुवारीनंतरची कंपनीच्या शेअरमधील ही सर्वोच्च वाढ आहे. यावर्षी मार्चमध्ये 6,540 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर 25 टक्क्यांनी वाढला आहे.

गुरूवारी ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. गुरुवारी (दि. 24 जून) बीएसईचा ऑटो इंडेक्स (BSE Auto Index) 4.4 टक्क्यांनी वाढला होता आणि तो टॉप सेक्टर गेनर म्हणून वर आला होता. मारूती सुझुकी लिमिटेड कंपनीच्या नफ्यावर गेल्या तीन वर्षात विविध गोष्टींमुळे विपरित परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळात कंपनीचे उत्पादन घटले होते, तसेच काही धातुंच्या किमतीत जागतिक पातळीवरील किंमत वाढली होती. या सगळ्याचा परिणाम ऑपरेटिंग डिलिव्हरीवर झाला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत एकूण प्रॉफिट मार्जिन -610bp आणि इबिट -570bp झाला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने गेल्या आठवड्यात एका अहवालात म्हटलं आहे की, मारुती सुझुकीची काही उत्पादनं पाइपलाईनमध्ये आहेत. यात प्रामुख्याने काही मॉडेल्सचे अपग्रेड करणं सुरू आहे. तसेच कंपनी नवीन मॉडेल्स सुद्धा लॉण्च करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे मार्केटमधील शेअर्सच्या किमतीत वाढ होण्यास मदत होईल. तर रिसर्च आणि ब्रोकरेज फर्मने मारूती सुझुकीच्या (MSIL) शेअर्सला 'बाय' रेटिंग देत, 10 हजार रुपयांच्या किमतीचे लक्ष्य सांगितले आणि MSIL चा बाजार हिस्सा FY22 मधील 45 टक्क्यांवरून FY24E मध्ये 46 टक्क्यांपर्यंत वाढला पाहिजे, असे म्हटले आहे.

दरम्यान, मारूती सुझुकी कंपनीने (एमएसआयएल) म्हटले आहे की, 2021-22 या वर्षात विक्री 43.6 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मार्च महिन्यात मारूती सुझुकीची मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने तिची उपकंपनी सुझुकी मोटर गुजरातच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन बॅटरीच्या प्रकल्पासाठी 10,400 कोटी रूपयांची गुंतवणूक करून गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणुकीतून ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे स्थानिकीकरण करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल. तसेच भारतातील बीईव्हीचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल, असा कंपनीला विश्वास आहे. कंपनी 2025 पर्यंत आपली पहिली BEV सादर करणार आहे.

image source - https://bit.ly/3NiRo3f