Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Cap: सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 'या' सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 2 कोटी रुपयांची वाढ

Market Cap

Market Cap: गेला आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. या 10 कंपन्यांमध्ये टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल,आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा समावेश करण्यात आला आहे. या टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आहे.

गेला आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. या 10 कंपन्यांमध्ये टीसीएस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), भारती एअरटेल (Bharti Airtel),आयटीसी (ITC), स्टेट बँक ऑफ इंडिया (Bank of India), बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा (Hindustan Unilever) समावेश करण्यात आला आहे.

या टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये एकूण 2,03,010.73 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टीसीएस कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 780.45 अंकांनी वाढला. या सेन्सेक्समध्ये 1.19 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी सेन्सेक्स 66,060.90 या नव्या उच्चांकावर बंद झाला. यावेळी काही कंपन्यांना फायदा, तर काही कंपन्यांचे नुकसान झालेले पाहायला मिळाले. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम

सेन्सेक्स टॉप बाजार भांडवल कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो. 

'या' कंपन्यांना झाला फायदा

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 69,990.57 कोटी रुपयांनी वाढून 18,53,033 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचे बाजार भांडवल 68,168.12 कोटींनी वाढून 12,85,058 कोटींवर पोहोचले आहे.

याशिवाय भारती एअरटेल कंपनीचे बाजार भांडवल 10,272.84 कोटी रुपयांनी वाढून 4,95,116.94 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इन्फोसिस कंपनीचे बाजार भांडवल 39,094.81 कोटी रुपयांनी वाढून 5,91,547.67 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

खाजगी बँकिंग क्षेत्रातील आयसीआयसी बँकेचे बाजार भांडवल 10,135.42 कोटी रुपयांनी वाढून 6,72,837.72 कोटी रुपयांवर पोहोचले आहे व आयटीसी कंपनीचे बाजार भांडवल 5,348.97 कोटी रुपयांनी वाढून 6,72,837.72 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

'या' कंपन्यांच्या भांडवलात घट

याचा उलट परिणाम म्हणून अनेक कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झालेली पाहायला मिळाली आहे. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 8,695.25 कोटींनी घटून 9,19,962.74 कोटींवर आले आहे. तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 4,581.7 कोटींनी घसरून 4,53,288 कोटी रुपये झाले आहे.

सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 8,299.89 कोटींनी घटून इतके 5,21,598.94 कोटी झाले आहे व बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 8,130.77 कोटींनी घटून 4,53,288.03 इतके कोटी झाले आहे.


Source: hindi.financialexpress.com